आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : अमेरिकन फोटोग्राफरने दाखवले पावसाळ्यातील भारतीयांचे जीवन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पावसाने दमदार हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्‍ट्र आणि विदर्भ- मराठ्यावाड्यातील काही जिल्‍ह्यांतसुद्धा जोरदार पाऊस झाला. त्‍यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आनंदी झाले. परंतु, शहरी भागातील लोकांच्‍या अडचणी वाढल्‍यात. याचेच चित्रण अमेरिकन फोटोग्राफर स्टीव्‍ह मेकरी यांनी केले.
काय आहे या फोटोंमध्‍ये....
> स्टीव्‍ह यांनी आपल्‍या फोटोंमधून मान्‍सूनला सर्वांगाने कैद केले.
> या फोटो सीरिजला त्‍यांनी 'लाइफ ब्रेथ ऑफ हाफ द वर्ल्ड' नाव दिले.
> हे फोटो त्‍यांनी भारतीतल विविध भागात घेतले.
> यात मुंबईतील पावसापासून ते पोरबंदरच्‍या पुरापर्यंतच्‍या फोटोंचा समावेश आहे.
> स्टीव्‍ह यांनी भारतासह इतर देशांतही त्‍याचे प्रदर्शन भरवले.
कोण आहेत स्टीव्‍ह मेकरी?
> स्टीव्‍ह मेकरी हे अमेरिकन फोटो जर्नलिस्ट आहेत.
> 'अफगाणी गर्ल कलेक्शन' नावाच्‍या फोटो बुकने त्‍यांना जगभर लोकप्रियता मिळवून दिली.
> 'इंडिया स्टीव्‍ह मेकरी' नावानेही त्‍यांचे एक फोटो पुस्‍तक प्रकाशित आहे.
> त्‍यांनी इराण-इराक युद्ध, गल्फ युद्ध, आणि अफगाण गृहयुद्धाला कव्‍हर केलेले आहे.
> त्‍यांना फोटोग्राफी आणि रिपोर्टिंगसाठी 12 पेक्षा अधिक आंतरराष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळालेले आहेत.
> त्‍यांनी वयाच्‍या अकराव्‍या वर्षीच भारतातील पावसाळ्याचे फोटो घेण्‍याची कल्‍पना केली होती. एका मासिकामध्‍ये छापून आलेल्‍या फोटोंमुळे त्‍यांना तसे सूचले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, स्टीव्‍ह मेकरी यांनी भारतील पावसाचे घेतलेले PHOTOS..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...