महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे हे नाव मैलाचा दगड बनले आहे. शिवसेनाप्रमुख म्हणून त्यांची जगभर ओळख आहे. पण, शिवसेनेची स्थापना होण्यापूर्वी एक सिद्धहस्त व्यंगचित्रकार म्हणून त्यांची ओळख होती. एवढेच नाही तर त्यांनी 'फ्री प्रेस जर्नल’मध्ये व्यंगचित्रकार काही काळ नोकरीसुद्धा केली. येत्या रविवारी शिवसेनेच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय बाळासाहेबांच्या कुंचल्यातून साकारलेले निवडक व्यंगचित्रं....
आर.के. लक्ष्मणसोबत केले काम
बाळासाहेब 1950 साली फ्री प्रेस जर्नल’मध्ये रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. नंतर त्यांनी ही नोकरी सोडून 'मार्मिक' नावाचे स्वत:चे नियतमालिक सुरू केले. ते आजही व्यंगचित्रासाठी प्रसिद्ध आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, बाळासाहेबांनी काढलेली निवडक व्यंगचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)