आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखंड महाराष्‍ट्राच्‍या ठरावासाठी शिवसेना-कॉंग्रेस एकत्र, उद्धव ठाकरेंची चव्हाणांसोबत चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वेगळ्या विदर्भावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत चांगलीच वादावादी होत आहे. त्‍यामुळे बुधवारी अखंड महाराष्‍ट्राचा ठराव आणून भाजपला घेरण्‍याची तयारी युती सरकारमधील शिवसेने केली. त्‍या अनुषंगाने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते पृथ्‍वीराज चव्‍हाण यांच्‍यासोबत आज (मंगळवार) फोनवरून चर्चा केली. दरम्‍यान, मी अखंड महाराष्‍ट्राचा मुख्‍यमंत्री आहे, असे निवेदन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्‍यमंत्री काय म्‍हणाले...
''राजीनामा मागायचा तुम्हाला अधिकार नाही. मी तुमच्या मेहरबानीवर सत्तेत आलेलो नाही, अखंड महाराष्ट्राच्या जनतेने आम्‍हाला निवडून दिले. मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असल्याने माझ्या कामाचे मूल्यमापन राज्याची जनता करेल,'' असे प्रतिपादन वेगळ्या विदर्भ राज्‍याच्‍या मुद्दयावरून विरोधकांनी उपस्‍थ‍ित केलेल्‍या प्रश्‍नांची उत्‍तरे देताना मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जाओ पहले प्रफुल्‍ल पटेल को पूछ के आओ म्‍हणत राष्‍ट्रवादीला ठणकावले
> देशाच्‍या विकासासाठी छोटी छोटी राज्‍यं असावी, ही भाजपची भूमिका छुपी नाही. शिवाय शिवसेनेनेही अखंड महाराष्ट्राची भूमिका कधीच सोडलेली नाही, असे स्‍पष्‍टीकरण देत त्‍यांनी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या दुतोंडी भूमिकेचाही समाचार घेतला.
> राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी वेगळ्या विदर्भासाठी समर्थन दिले आहे. मग त्याची चर्चा विधानसभेत करायची का? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीची गोची केली.
> शिवाय 'जाओ पहले प्रफुल्‍ल पटेल को पूछ के आओ' म्‍हणत त्‍यांनी राजीनामा देणार नसल्‍याचे त्‍यांनी ठणकावून सांगितले.
बेळगाववरून शिवसेना लोकसभेत आक्रमक
> महाराष्‍ट्र - कर्नाटक सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी मागणी शिवसेनेने आज (मंगळवारी) लोकसभेत केली
> शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मराठीतून भाषण करताना लोकसभेत हा मुद्दा रेटून धरला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा,
> विदर्भ हवा असेल तर राजीनामा द्या
>सरकारची भूमिका ‘ब्रेक इन महाराष्ट्र’ची
>शिवसेना-भाजपत फूट पाडण्याचा डाव
>अखंड महाराष्ट्राचा एकमुखी जयघोष
बातम्या आणखी आहेत...