आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अारक्षणासाठी धनगर समाज नवा पक्ष स्थापण्याच्या तयारीत, UP निवडणुकीीवरही लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवल्याबद्दल देशातील धनगर समाजात मराठा समाजासारखीच मोठी खदखद अाहे. आरक्षणाच्या मागणीबाबत आंदोलनाचे विविध मार्ग निष्फळ ठरल्याने वैतागलेल्या धनगर समाजाने आता ‘जो धनगरके हित बात करेगा, वो देश पर राज करेगा’ अशी घोषणा देत पुढच्या वर्षी येऊ घातलेल्या गुजरात, उत्तर प्रदेश राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची राजकीय समीकरणे उद्ध्वस्त करण्यासाठी राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याची तयारी चालवली अाहे.

देशात धनगर समाजाची लोकसंख्या १४ कोटींच्या आसपास आहे. मात्र, या समाजाला प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या वर्गवारीचे आरक्षण आहे. महाराष्ट्रात भटका विमुक्त, बिहार आणि मध्य प्रदेशात अनुसूचित जमाती तर उत्तर प्रदेशात धनगर समाज अनुसूचित जातीमध्ये आहे. उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांच्या बसपाशी मोठा संघर्ष करून या समाजाने अनुसूचित जातीमध्ये प्रवेश मिळवला खरा, पण जात प्रमाणपत्रे मिळत नसल्याने धनगर समाजाला या राज्यात म्हणावे तसा आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. राज्यातही धनगर आरक्षणाचा विषय पुढे जात नाही.
पुढील स्‍लाइडवर वाचा, अखिलेश यादवांच्या सरकारला अल्टिमेटम
बातम्या आणखी आहेत...