आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे शोभायात्रा, तर कुठे सांस्‍कृतिक कार्यक्रम, राज्‍यात गुढीपाढवा उत्‍साहात, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई शहरात निघालेली गुढीपाडव्‍याची शोभायात्रा. (छाया : महेश टिकले) - Divya Marathi
मुंबई शहरात निघालेली गुढीपाडव्‍याची शोभायात्रा. (छाया : महेश टिकले)
मुंबई - दारावर आंब्‍याच्‍या पानांचे तोरण... अंगणात आकर्षक रांगोळी... घराघरांवर आनंदाची गुढी... प्रसन्न सकाळ... शहराच्या विविध भागांतून निघालेल्या स्वागतयात्रा आणि सायंकाळपर्यंत रसिकांना लाभलेली सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, अशा उत्‍साहात मराठी नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा संपूर्ण मुंबईसह राज्‍यात सर्वर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
अनेक ठिकाणी निघाली शोभायात्रा
पुणे-मुबईसह राज्‍यातील अनेक शहरात कुठे बुलेट, कुठे दुचाकी तर कुठे पायी शोभायात्रा काढण्‍यात आली. काही ठिकाणी शोभायात्रेमध्‍ये अश्‍वही होते. लुगडे, कपाळावर भल्‍ले मोठं कुंकू आणि नाकात नथ अशा मराठमोळ्या वेशभूषेत यामध्‍ये महिलांनी सहभाग नोंदवला.
नाशिकमध्‍ये नरेंद्र महाराजांच्‍या उपस्‍थ‍ितीत मिरवणूक
नाशिकमध्‍ये यंदा नाणिजपीठाचे नरेंद्र महाराज यांच्‍या उपस्‍थितीत शोभायात्रा काढण्‍यात आली. यात हजारो भाविकांनी भाग घेतला. मिरवणुकीत स्‍त्रीभ्रूण हत्‍त्‍या, व्‍यवसनमुक्‍ती असे संदेश देण्‍यात आले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, गुढीपाडव्‍याच्‍या मिरवणुकीचे फोटोज...
छाया : महेश टिकले, मुंबई.