आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसाने मुंबईला झाेडपले, चाकरमान्यांचे हाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईत शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पावसामुळे रेल्वे अाणि रस्ते वाहतूक सेवा विस्कळीत झाली. पावसाचा जाेर वाढल्याने सायन, माटुंगा, कुर्ला या भागात रुळांवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली हाेती. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले.
शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत मुंबईत सरासरी ७.७३ मि.मि. पाऊस पडला. पूर्व उपनगरात १०.४२ मि.मि. तर पश्चिम उपनगरात १६.०९ मि.मि. पावसाची नाेंद झाली. विविध विभागात चार ठिकाणी घरांच्या भिंती पडल्या तर अाठ ठिकाणी शाॅर्ट सर्किट झाले. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सायन स्थानकात रुळांवर पाच ते सात इंच पाणी साचले हाेते. मशीद अाणि सँडहर्स्ट राेड भागातही पाणी साचले हाेते. काेणत्याही प्रकारचा धाेका नकाे म्हणून ठाणे ते सीएसटीदरम्यान धिम्या मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात अाली. विमानसेवाही विस्कळीत झाली हाेती.

ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
> पावसामुळे शहरातील प्रमुख मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.
> अनेक ठिकाणी डांबर उखडून मोठ - मोठे खड्डे पडले आहेत.
> मुलुंड टोलनाका ते कांजूर, मुलुंड ते घाटकोपर, एलबीएस रोड, जेव्हीएलआर रोड आणि वांद्रे वरळी सी लिंकवर वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.
लोकलवरही परिणाम
> मुंबईची धमणी म्‍हटल्‍या जाणाऱ्या लोकलसेवेवरही पावसाचा परिणाम झाला.
> मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे.
> मध्य रेल्वे – 15-20 मिनिटं, हार्बर रेल्वे – 10-15 मिनिटं, तर ट्रान्सहार्बर – 10-15 मिनिटं उशिराने सुरु आहे.
> सायन रेल्वे ट्रकवर पाच ते सहा इंच पाणी साचले आहे.
दोन तासांत 31 मिमी पाऊस
मुंबई शहरात शुक्रवारी सकाळी दोन तांसात 31 मिमी तर उपनगरांमध्ये 19 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पुढील दोन दिवस पावसाचे
मुंबई नगर आणि उपनगनरात पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्‍याने वर्तवला आहे.
बेस्टने मार्ग 30 मार्गावरील वाहतूक वळवली
रस्‍त्‍यावरील खड्डे, साचलेले पाणी यामुळे बेस्टने 30 प्रमुख मार्गावरील आपल्या बसेस दुसऱ्या मार्गावर वळवल्या आहेत. बीपीटी कॉलनी येथील मुलजी राठोड चौक, सायन, किंग्ज सर्कल, हिंदामाता, प्रतीक्षा नगर आणि नॅशनल कॉलेज बांद्रा येथील रस्त्यावर पाणी साचले आहे.
कर्मचाऱ्यांना हाफ डे, वीजपुरवठा खंडित
> काही खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हाफ डे दिला.
> पावसामुळे वीज प्रवाह इतर ठिकाणी उतरून दुर्घटना होऊ शकते, हे हेरून रिलायन्स एनर्जीकडून कुर्ल्यासह काही भागांतील वीजपुरवठा खंडित.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, मुंबईतील पावसामुळे उडालेली त्रेधात्रिपट...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)