आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई - दादर स्‍थानकावरील बिघाड दुरुस्‍त, पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दादर स्‍थानकावर तांत्रिक बिघाड झाल्‍याने मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक सोमवारी सकाळी सकाळी विस्कळीत झाली होती. त्‍यामुळे पश्चिम मार्गावर तर दोन्ही बाजूने रेल्वे सेवा ठप्प झाली होती. दरम्‍यान, रेल्‍वे प्रशासनाने बिघाड दुरुस्‍त केली असून, वाहतूक सुरळीत झाली आहे.
सोमवार, पाऊस आणि लोकल नाही
आठवड्याचा पहिला दिवस असल्‍याने आज लोकलने ये- जा करणाऱ्या चाकारमान्‍याची संख्‍या लक्षणीय आहे. त्‍यातल्‍या त्‍यात रीमझिम पाऊस पडत आहे. मात्र, अचानक झालेल्‍या बिघाडीमुळे पश्चिम रेल्‍वेच्‍या सर्व मार्गावरील वाहतूक ठप्‍प झाली. त्‍यामुळे अनेक जण रेल्‍वे स्‍थानकात अडकून पडले होते.
गाडीतील वीज गूल
काही प्रवासी रेल्‍वेतच बसलेले आहेत. दरम्‍यान, गाडीतील वीज गूल असल्‍याने पंखे बंद होते त्‍यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...