आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंडरवर्ल्डमध्‍ये या माफिया QUEEN ची होती दहशत, दाऊदही घाबरायचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  अंडरवर्ल्डची पहिली महिला डॉन  जेनाबाई दारुवाला हिच्‍या जीवनावर आधारित \'अम्मा\' ही हिंदी मालिका एका वाहिनीवर सुरू झाली. यात  उर्वशी शर्मा ही जेनाबाईची भूमिका करत आहे. एक तांदूळ विक्रेती ते  माफिया क्वीन असा जेनाबाईचा प्रवास आहे. तिला  हाजी मस्तान, वरदराजन आणि दाऊदसारखे कुख्‍यात डॉनसुद्धा घाबरत असत. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार मुंबईतील लेडी डॉन बाबत खास माहिती...
 
 
जेनाबाई दारूवाला
जेनाबाई दारूवाली ही देशातील पहिली महिला डॉन होती, असा उल्‍लेख प्रसिद्ध पत्रकार, विचारवंत हुसैन जैदी यांच्‍या \'माफिया क्विंस ऑफ मुंबई\' या पुस्‍तकात आहे. मुंबईतील डोंगरी परिसरामध्‍ये ती दारूचा धंदा करत होती. तिचा शब्‍द हाजी मस्तान आणि दाऊदसाठी अंतिम असे.
जेनाबाई हिने दारूच्‍या धंद्यापासून ते तांदळाचा काळाबाजार असा आपला व्‍यवसाय वाढवला. एवढेच नाही तर तिने आयुष्‍याच्‍या उतरवयात पोलिसांसाठी खबऱ्याचे काम केले. तिच्‍या मुलाची गँगवारमध्‍ये गोळ्या झाडून हत्‍या करण्‍यात आली. त्‍यानंतर जेनाबाईने गुन्‍हेगारी कारवायाला अलविदा केला. असे सांगतात की वर्ष 1993 च्‍या बॉम्‍बस्‍फोटामुळे ती खूप व्‍यथित झाली होती. त्‍यातच तिला आजारपणे आले. नंतर काहीच दिवसांत तिचा मृत्‍यू झाला.

पुढील स्लाइड्स जाणून घ्‍या, मुंबईतील अंडरवर्ल्डमधील इतर लेडी डॉनच्‍या बाबतीत....
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)