आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालवणी : वेश्याव्यवसायातूनच झाले तिहेरी हत्‍याकांड, तिघांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बबली शॉ,  आर्यन आणि शायना - Divya Marathi
बबली शॉ, आर्यन आणि शायना
मुंबई - मालवणीच्या न्यू कलेक्टर कॉलनीमध्ये राहणार्‍या बबली शॉ (47), त्यांची नातवंडे आर्यन (13) आणि शायना (8) या तिघांची बुधवारी मध्यरात्री झालेल्‍या हत्‍येची गुढ उकलले असून, घरात सुरू असलेला कुंटणखानाच या तिघांच्या जीवावर बेतला. या प्रकरणी क्राइम ब्रँच युनिट अकराच्या पथकाने वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलेसह तिघांना अटक केली. शबिना ऊर्फ सना शेख, मोफीद ऊर्फ सलमान अहमद शेख, आणि सलमान अकबर शेख अशी आरोपींची नावे आहेत.
का केला खून
> बबली ही स्वत: वेश्याव्यवसाय करत होती.
> तिने तिच्‍या मालवणी येथील घरातील पोटमाळाही वेश्याव्यवसायासाठी भाड्याने दिला होता.
> या ठिकाणी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला काही वेळासाठी ग्राहकांना घेऊन येत.
> त्‍या बद्दल्‍यात ती त्‍यांच्‍याकडून 500 ते 700 रुपये भाडे घ्यायची.
> मागील काही महिन्‍यांपासून शबिनाही तिच्याकडे वेश्याव्यवसायासाठी येत होती.
> एक दिवस शबिनाची नजर तिच्या तिजोरीवर पडली.
> त्यामुळे शबिनाने हे पैसे चोरण्‍यासाठी पतीच्‍या मदतीने खून केला.
> तिचा पती रिक्षाचालक आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, पोलिसांनी कसे पकडले आरोपीला....तिजोरी नाही फुटली, पण तीन जीव गेले...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...