आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून मुंबईत: 10 वर्षांत पहिल्‍यांदाच मान्‍सून विदर्भमार्गे राज्‍यात, वाचा कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहायला लावणारा मान्‍सून अखेर विदर्भ मार्गे महाराष्ट्रात दाखल झाला. रविवारी सायंकाळपासून राज्‍यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. सोमवारी सकाळी मान्‍सूनने मुंबईत एंट्री घेतली. दरम्यान, पुढील 24 तासांत संपूर्ण कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भाच्या आणखी काही भागांत सकाळ आणि दुपाारच्‍या सुमारास जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
भाकिते ठरली खोटी
> यंदा मेपूर्वीच देशात तर महाराष्‍ट्रात जूनच्‍या पहिल्‍या आठवड्यात मान्‍सून हजेरी लावेल, असा अंदाज व्‍यक्‍त केला गेला होता.
> मात्र, ही सर्व भाकिते खोटी ठरवून लांबलेला नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
10 वर्षांत पहिल्‍यांदा बदलली मान्‍सूनची दिशा
दरवर्षी महाराष्‍ट्रात तळ कोकणातून मान्‍सूम येतो. परंतु, यंदा तो हे मार्गक्रमण कोकणातून होण्याऐवजी विदर्भातून झाले. गेल्‍या दहा वर्षांत पहिल्‍यांदाच असे झाले.

का बदलली मान्‍सूनने दिशा ?
पश्चिम बंगालच्या उपसागरावरील शाखा अधिक सक्रिय असल्याने कोकण आणि गोव्याला हुलकावणी देत शनिवारी मान्सूनने विदर्भात सर्वप्रथम धडक मारली. दरम्यान, पुढील 24 तासांत संपूर्ण कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भाच्या आणखी काही भागात पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. दोन दिवसांत कोकण-गोव्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाजही वेधशाळेने वर्तविला होता. परंतु, मान्सूनची अरबी समुद्राची शाखा सक्रिय नसल्याने मान्सूनला चालना मिळण्यासाठी या भागात पोषक स्थिती नव्हती. त्यामुळे कोकण-गोव्याच्या दिशेने मान्सूनचे वारे फारसे पुढे सरकू शकलेले नाहीत.
मुंबईत मान्‍सूनची दमदार एंट्री
पूर्व विदर्भातून सोमवारी मुंबईतही मान्‍सून दाखल झाल्‍याची माहिती, हवामान विभागाने दिली आहे. मात्र, पहिल्‍याच पावसाने शहरवासियांची दाणादान उडाली असून, अनेक ठिकाणी नाल्‍या तुंबल्‍या आहेत. परिणामी, रस्‍त्‍यावर पाणी साचले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, गेल्या 24 तासांत राज्यात झालेला पाऊस
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)