आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे गोमाता संरक्षण, सोमय्यांची हटाव मोहीम, देवळांसमोर गाई बांधण्यास बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार गाईचे संवर्धन व संरक्षण करण्यास प्राधान्य देत असताना भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मात्र अापल्याच पक्षाच्या िवरोधात भूमिका घेतली आहे. सोमय्या यांच्या दबावामुळे मुलुंडमधील मंदिरांसमोर ३३ िठकाणी गाई उभ्या करण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे गायींच्या पूजेवर पोट असणाऱ्या भटक्या समाजातील कुटुंिीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

मुलुंड परिसरात काही िठकाणी पशुपालन, प्राणी दयाभावाच्या नावाखाली काही वेळेला वेगळ्या प्रवृत्तीचे प्रकार होत असतात. त्यामुळे परिसरात घाण व अस्वच्छता निर्माण होऊन रोगराई पसरते. यामुळे गाई देवळांसमोर उभ्या करण्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी पत्राद्वारे मुलंुडच्या सहायक आयुक्तांकडे १९ िडसेंबर २०१५ ला केली होती. या पत्राची आयुक्तांनी दखल घेऊन या गाईंना मुलुंड पश्चिम रेल्वेस्टेशन, सर्वोदयनगर परिसर व मुलुंड काॅलनी या िठकाणी देवळांसमोर उभ्या करण्यास बंदी घालण्यात आली.
गोभक्तीचा व्यवसाय..
गाईची पूजा करणे वा तिला चारा खाऊ घालणे हे पुण्यकर्म अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे. मुंबईत राहणाऱ्यांना गोसेवेचे हे पुण्य कसे मिळणार? या प्रश्नावर तोडगा म्हणून मुंबईत गेली अनेक दशके भटक्या समाजाचे लोक विविध कोपऱ्यांत गाई आणि सोबत चारा घेऊन बसतात. गोभक्त सामान्य जनता त्यांच्याकडूनच चारा विकत घेऊन सोबत बांधलेल्या गाईला खाऊ घालतात. गोसेवेचे कथित पुण्य अशा श्रद्धाळूंना मिळते, तर दुसरीकडे गाई घेऊन बसलेल्या भटक्या समाजातील लोकांना पैसे मिळतात.

पैशांमधून भटक्या समाजातील नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या कुटुंबांची गुजराण गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, चार महिन्यांपासून बंदी घातल्यामुळे या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुलुंड परिसरात एकूण ३३ िठकाणी गाई बांधल्या जात होत्या. यावर सुमारे ४० कुटुंबांची गुजराण होत होती. पण, साेमय्यांच्या दबावामुळे आतापर्यंत कधी न जाणवलेल्या स्वच्छतेच्या अटी महापािलकेने पुढे करून बंदी आणली आहे. दरम्यान, याबाबत सोमय्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, मी मीटिंगमध्ये आहे, व्यग्र आहे, अशी कारणे देत त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

गाई बांधण्यास विराेध का?
मुलूंड परिसरात मंदिरच्या जवळ रस्त्याच्या कडेला िकंवा पदपथावर सार्वजनिक िठकाणी दोन िकंवा तीन गाई बांधून त्यांना चारा, पाणी, लाडू िदले जातात. यामुळे रस्त्यांवर सर्वत्र घाण पसरते. सार्वजनिक िठकाणी अस्वच्छता करणे अयाेग्य असल्याने बंदी घालण्यात आली आहे, असा खुलासा महापालिका टी िवभागाच्या सहायक आयुक्तांनी केला आहे. मात्र अाताच हे कसे अाठवले असा सवाल भटक्या समाजाच्या लाेकांनी केला अाहे.
शिवसेना भटक्या समाजाच्या बाजूने, नऊ वर्षे अाधार
मुंबईत नाथपंथी डवरी समाजाच्या वसाहती असून त्यांचा प्रमुख व्यवसाय हा मंदिराशेजारी गायी घेऊन बसणे, पारंपरिक गाेंधळ घालणे असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. मात्र, महापालिका त्यांना हटवत असल्याने, त्यांच्यावर कारवाई करत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या समाजावर होणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी िशवसेनेने केली होती. माजी सभागृह नेते सुनील प्रभू यांनी तसे पत्र मुंबई पालिकेचे माजी आयुक्त राजीव यांनी िलहिले होते. या पत्रानंतर भटक्या समाजाला गेली नऊ वर्षे आधार िमळाला होता.

बंद आंदोलनाची हाक
सोमय्यांना आताच गाईमुळे परिसर अस्वच्छ होत असल्याचा साक्षात्कार व्हावा, याचे आश्चर्य वाटते. गाईंचे गोमूत्र व शेण हे पर्यावरणपूरक असल्याने आतापर्यंत त्याचा कधीच कोणाला त्रास झाला नव्हता. पण, स्वच्छतेच्या नावाखाली गाईंवर बंदी घालून भटक्या समाजाच्या कुटुंबांना उद्ध्वस्त करण्यात येत आहे. याविरोधात पुढील आठवड्यात मुलुंड बंद आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात राज्यभरातून भटक्या समाजाचे लोक सहभागी होतील, अशी प्रतिक्रिया भटक्या व िवमुक्त जाती संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र भाेसले यांनी व्यक्त केली.