आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'\'सनातन प्रमुख विष्णूचा अवतार, शरिरातून पडतात दिव्य कण, जिभेवर ओम\'\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्‍ट्र अंधश्रद्धा निमुर्लन समितीचे कार्याध्‍यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्‍या 'सनातन'च्‍या साधकांनी घडवून आणल्‍याचा सीबीआयला संशय आहे. त्‍यामुळे 'सनातन' संस्‍था चर्चेत आली आहे. या संस्‍थेचे प्रमुख जयंत बालाजी आठवाले हे भगवान विष्‍णूचा अवतार असल्‍याचा दावा संस्‍थेने आपल्‍या इंटरनेट ब्‍लॉगवर केला आहे. संस्‍थेने म्‍हटले की, डॉ. आठवले हे सामान्‍य पुरुष नाहीत. त्‍यांच्‍या शरिरात दैवी बदल होत आहे.
काय म्‍हटले ब्‍लॉगमध्‍ये?
> संस्था आणि अठवाले यांच्‍याशी निगडित वेबसाइट आणि अफिशियल ब्लॉग्समध्‍ये सप्‍टेंबर 2015 मध्‍ये पोस्‍ट करण्‍यात आलेल्‍या एका लेखात म्‍हटले, आठवले हे भगवान विष्‍णू यांचा अवतार आहेत. त्‍यांचे केस सोनेरे होत असून, त्‍यांच्‍या शरिरातून दिव्य कण पडत आहेत. एवढेच नाही तर त्‍यांचे नख, कपाळ आणि जिभेवर ओम, कमळ आणि त्रिशूलाचे चिन्‍ह आले आहे. शिवाय त्‍यांचे शरीर सुगंधित झाले आहे. तसेच एका फोटोत एक पिंक टॉयलेट ब्रश दाखवला असून, त्‍याला दिलेल्‍या कॅप्‍शनमध्‍ये म्‍हटले की, आठवले याचा वापर करत असल्‍याने त्‍याचा रंग बदलला.
> spiritualresearchfoundation.org वर एका लेखात याचा उल्‍लेख केला आहे. यात म्‍हटले,'' डॉ. अठवाले यांच्‍या शरीरात निगेटिव्‍ह एनर्जी अॅटकमुळे अनेक बदल झाले आहेत.''
अजून काय म्‍हटले लेखात...
ऑर्गनाइजेशनद्वारा चालवणा-या या ब्लॉग englishsanatanprabhat. blogspot मध्‍ये अठवाले यांना भगवान विष्‍णू यांचे अवतार असल्‍याचे म्‍हटले आहे. ब्लॉगवरील लेखात म्‍हटले, '' देशाला हिंदूराष्‍ट्र करण्‍यासाठी गुरू (डॉक्टर) अठवाले दिवस- रात्र उपवास करतात. त्‍यांच्‍या मनात कायम हाच विचार घोळत असतो. ते देवाचे अवतार आहेत. नदिपट्टी भविष्णवाणियरमध्‍ये ऋषींनीसुद्धा त्‍यांना विष्णूचा अवतार असेच म्‍हटले आहे. त्‍यांच्‍यावर शरिरावर आलेल्‍या अनेक चिन्‍हांतून ते स्‍पष्‍ट झाले आहे.
कोण आहेत आठवले?
जयंत आठवले यांचा जन्‍म रायगड जिल्‍ह्यातील नागठाणे या गावात झाला. त्‍यांनी लंडन येथून क्‍लीनिकल हिपनोथ्रॅपीचे शिक्षण घेतले. नंतर ते मुंबईत आले.
काय आहेत सनातनवर आरोप?
> मुंबईमध्‍ये एका नाटकाचा प्रयोग थांबवण्‍यासाठी बॉम्‍ब ठेवल्‍याप्रकरणी 2007 मध्‍ये एटीएसने सनातनच्‍या तीन साधकांना अटक केली होती.
> पुढे 2009 मध्‍ये मडगाव बॉम्‍बस्‍फोटात 150 साधकांची चौकशी करण्‍यात आली होती.
> तसेच गोवा येथे बॉम्‍ब ठेवताना सतानतच्‍या दोन साधकांचा मृत्‍यू झाला होता.
> 2015 मध्‍ये गोविंद पानसरे यांच्‍या हत्‍याप्रकरणात समीर गायकवाड या सनातनच्‍या साधकाला अटक करण्‍यात आली.
> आता दाभोलकर यांच्‍या हत्‍यासुद्धा सनातनच्‍या साधकांनी घडवून आणल्‍याचे पुरावे मिळाल्‍याचा दावा, सीबीआयने केला.

पुढील स्‍लाइडवर पाहा संबंधित फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...