आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरवापर होत असल्यास अॅट्रॉसिटी कायदा बदला; राज ठाकरेंची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अॅट्रॉसिटीकायद्याचा जर दुरूपयोग होत असेल, तर तो कायदा बदलला पाहिजे, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मांडली. जाती आणि धर्मनिहाय कायदे हवेतच कशाला?, असा सवाल करत आर्थिक निकषावर आरक्षण असावे, अशी मागणीही त्यांनी मंगळवारी केली. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आदेशही मनसेच कार्यकर्त्यांना दिले.
यशवंत सभागृहात झालेल्या या बैठकीचा हेतू स्पष्ट करत राज ठाकरे भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले, ‘निवडणुका सोडल्या तर या देशात दुसरा धंदा नाही. त्यामुळे निवडणुकीसाठीच ही बैठक आहे. निवडणुका लढताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही सर्वात आधी एक सामान्य नागरिक आहात. त्यामुळे काही झाले तरीही लोकांचा विसर पडू देऊ नका’, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

मी बोललो तर टीका, पवारांबाबत मात्र मौन
‘अॅट्रॉसिटी गैरवापराबाबत आपण बोललो तर टीका होते. पण शरद पवार बोलले, तेव्हा मात्र सगळे चिडीचूप का?’ असा सवाल ठाकरेंनी केला. मोदी एखादी गोष्ट बोलले तर ते भावनिक आवाहन होते, मग मी बोललो तर ते राजकारण कसे होते असा टोलाही त्यांनी टीकाकारांना लगावला. मात्र तुम्ही कितीही टीका करा, आपण महाराष्ट्राच्या हिताचेच बोलत राहणार असेही त्यांनी सांगितले.
नेमके काय म्‍हणाले राज ठाकरे ?
> वाहतूक नियम मोडणाऱ्यांना अधिकच दंड आकारा.
> गैरवापर होत असेल तर अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा.
> दहिहंडी सणावर नियम लादण्‍याचा प्रकार म्‍हणजे मराठी, हिंदू सण संपवण्याचे कारस्थान.
> देशात निवडणुकीशिवाय दुसरा धंदाच नाही.
> अॅट्रोसिटीच्या कायद्यात बदल करायला हवा.
> गुन्हेगारांना कायद्याचा वचकच राहिला नाही.
> अॅट्रॉसिटीऐवजी दुसरा कायदा आणायला हवा.
> महाराष्ट्राच्या हिताचं असेल, तेच करणार.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, अॅट्रासिटीच्‍या कायद्याबाबत राज ठाकरे नेमके काय म्‍हणाले...
बातम्या आणखी आहेत...