आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#मन की बात : शिवसेनेचा मोदींवर वार, म्‍हटले - चहापेक्षा किटली गरम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना,' अशी अवस्‍था शिवसेना आणि भाजपची झाली आहे. याची प्रचिती पुन्‍हा आली. शिवसेनेचे मुख्‍यपत्र असलेल्‍या 'सामना'मधून मंगळवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यावर टीका करण्‍यात आली. निवडणुकीअगोदर मोदींनी काळा पैसा भारतात आणून प्रत्‍येकाच्‍या खात्‍यात 15 लाख रुपये जमा करण्‍याचे आश्‍वासन दिले होते. त्‍याचे काय झाले, असा प्रश्‍नही यातून उपस्‍थ‍ित करण्‍यात आला.
म्‍हटले - चहापेक्षा किटली गरम
सामनाच्‍या अग्रलेखात म्‍हटले, मोदी यांची ‘मन की बात’ कडक चायप्रमाणे आहे. ‘‘देश बदलत आहे, पण आम्हाला फुकट चहा नको. निवडणुकीपूर्वी वचन दिल्याप्रमाणे आमच्या बँकेत पंधरा लाख रुपये कधी जमा करताय ते सांगा?’’ असे एखाद्या तिरपागड्याने विचारले तर काय करावे? त्यास मारावे, जाळावे की धरावे असा प्रश्‍न काहींना पडू शकतो. चायपेक्षा किटली गरम म्हणतात ते यालाच! अर्थात आमचे त्या तिरपागड्यांना उत्तर असे आहे की, बाबांनो, पंतप्रधान मोदी ५० वर्षांची घाण साफ करीत आहेत. मोदी यांना थोडा वेळ द्या. मात्र, एखादा तिरपागडा सत्य बोलतो म्हणून त्यास मारावे, जाळावे असे बोलणे हे काही आपल्या संस्कृतीत बसत नाही. पंतप्रधान मोदी यांच्याविषयी ममत्व असल्यामुळेच आम्ही हे विनम्रपणे सांगत आहोत!'
पुढील स्‍लाइडवर वाचा, शिवसेनेने कसा घेतला मत की बातचा समाचार...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)