आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गँगस्टरसोबत खोलीत होती ही मॉडल, सांगितले एन्‍काउंटरच्‍या रात्री काय झाले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गुडगावचा कुख्‍यात डॉन संदीप गडोली याचे हरियाणा पोलिसांनी मुंबईमधील एका हॉटेलमध्‍ये एन्‍काउंटर केले. त्‍या रात्री त्‍याच्‍यासोबत त्‍याची प्रेयसी दिव्या पाहुजा घटनास्‍थळावर होती. या एन्‍काउंटर बाबत हरियाणा पोलिसांनी मुंबई पोलिसांना काहीही माहिती दिली नव्‍हती. त्‍यामुळे मुंबई पोलिसांनी हरियाणा पोलिसांवर गुन्‍हा दाखल केला. एवढेच नाही तर यात दिव्यालाही आरोपी केले. मात्र, दिव्‍याने आपल्‍यावरील आरोप फेटाळून लावत म्‍हटले, ''मी फक्‍त संदीप याच्‍यासोबत त्‍या रात्री खोलीत होते, हाच माझा गुन्‍हा.''
दिव्‍याने अजून काय म्‍हटले...
दिव्‍याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर या प्रकरणी आपली बाजू मांडताना लिहिले, 'मी निर्दोष आहे. मुंबई पोलिस मुद्दाहून मला यात गोवत आहे. मी मरेन. पण, जेलमध्‍ये जाणार नाही. त्‍या रात्री केवळ संदीपसोबत होते, हाच माझा गुन्‍हा आहे.''
काय आहेत दिव्‍यावर आरोप
> गुडगाव पोलिसांनी मुंबईमध्‍ये संदीप गाडौली याचे एन्‍काउंटर केले होते.
> त्‍याच्‍यावर अनेक गंभीर गुन्‍हे दाखल होते.
> यासाठी दिव्‍याने गुडगाव पोलिसांना सहकार्य केल्‍याचा आरोप आहे.
> या प्रकरणी गुडगाव पोलिसांनी मुंबई पोलिसांना काहीही माहिती न देता हे एन्‍काउंटर घडवून आणले होते.
> त्‍यामुळे मुंबई पोलिसांनी गुडगाव पोलिसांसह दिव्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला.
> यात गुडगावच्‍या पाच पोलिसांना अटक होऊ शकते.
दिव्‍यामुळे हरियाणा पोलिसांना कळाला संदीपचा ठावठिकाणा...
> 19 वर्षीय दिव्‍यासोबत डॉन संदीपचे प्रेमसंबंध होते.
> त्‍यामुळे हरियाणाचा साइबर क्राइम सेल दिव्याच्‍या लोकेशनवर नरज ठेवून होता.
> घटनेच्‍या तीन ते चार दिवसांपूर्वी दिव्याचे लोकेशन राजस्थानच्‍या एका हॉटलमध्‍ये मिळाले होते.
> मात्र, पोलिस त्‍या ठिकाणी पोहोचण्‍यापूर्वी दिव्‍या तिच्‍या आईसोबत निघून गेली.
> याच प्रकारे दिव्‍याचे लोकेशन शोधून पोलिसांनी संदीपचे एन्‍काउंटर केले.
दिव्‍या म्‍हटले माझ्या विरोधात मुंबई पोलिसांकडे पुरावाच नाही...
> मी संदीपच्‍या एन्‍काउंटरसाठी हरियाणा पोलिसांना सहकार्य केले, याचा मुंबई पोलिसांकडे काहीच पुरावा नाही.
> माझे कॉल डिटेल्‍स तपासून पाहा, मी त्‍या रात्री हरियाणा पोलिसांच्‍या संपर्कात नव्‍हते.
कोण आहे दिव्या पाहुजा
> दिव्या पाहुजा ही हरियाणातील गुडगाव येथील रहिवासी आहे.
> ती डेल्ही फॅशन क्लब डॉट कॉमसाठी मॉडलिंग करते.
पुढील स्लाइड्सवर संबंधित फोटोज..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...