आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना@50: शाखाप्रमुख म्‍हणतात, सरकार आपले वाटत नाही, भाजपशी काडीमोडच घ्‍या !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद / नाशिक/ जळगाव/ सोलापूर/ अकोला - "आवाज कोणाचा...?" असा गगनभेदी पुकारा होताच तितक्याच बुलंद ताकदीने "शिवसेनेचा...!" असा प्रतिसाद यायचा आणि आसमंत दुमदुमून जायचा. हीच शिवसेना रविवारी आपली पन्नाशी पूर्ण करते आहे. स्थानिक पातळीवर संघटन आणि जनसंपर्क सांभाळणारे शाखाप्रमुख हा खरं तर शिवसेनेचा प्राण. शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे त्यांना 'टॉनिक' संबोधत असत. या शाखाप्रमुखांना आज शिवसेनेत किती महत्त्व राहिले आहे? पक्षाच्या भवितव्याबद्दल त्यांना काय वाटते? शिवसेनेचा सहभाग असलेल्या सरकारबद्दल आपलेपण वाटते का? याविषयी जाणून घेण्याचा हा प्रयत्न. राज्यातील निवडक शाखाप्रमुखांशी संवादसाधून घेतलेलाहा धांडोळा....

शिवसेनेचीखरी भिस्त आहे ती शाखाप्रमुखांवर. पूर्वी पक्षात शाखाप्रमुखांना कमालीचे महत्त्व होते. नेते, सरकार आणि शिवसैनिकांतील दुवा मानला गेलेला हा आधारवड काळाच्या ओघात कमी महत्त्वाचा ठरू लागला आहे. निवडणुकांपुरती पक्षाला आपली आठवण येते अशी त्यांची भावना झाली आहे. असे असले तरी शिवसेनेचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे या शाखाप्रमुखाला वाटते. राज्यातील भाजप-शिवसेना युतीचे सरकार बहुतांश शाखाप्रमुखांना आपले वाटत नाही. सत्तेत वाटेकरी असलो तरी दुय्यम वागणूक मिळत असल्याने प्रश्न मार्गी लागत नाहीत, अशी त्यांची खंत आहे. याउलट आधीच्या काँग्रेस आघाडीच्या काळात शिवसैनिकांची कामे होत. निदान तेव्हा आंदोलन तरी करता येत होते. भाजपकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे नमूद करतानाच या पक्षाशी असलेले संबंध शिवसेनेने तोडून टाकले पाहिजेत आणि स्वबळावर निवडणूक लढवली पाहिजे, असेही काहींचे मत आहे. तथापि, मतभेद कुटुंबातही असतात. ते सामोपचाराने मिटवावेत, असे काही जण म्हणतात.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कट्टर शिवसैनिक बाळासाहेबानंतरच्‍या शिवसैनेबद्दल काय म्‍हणतात...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)