आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशीष शेलार \'शकुनीमामा\', शहा \'गब्बर\', भंडारी \'सांभा\', वाचा सेनेचे आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेने मंगळवारी सकाळी चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर भाजप विरोधात निदर्शने केली. दरम्‍यान, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांचा पुतळा जाळला तर राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अमित शहा यांचे 'हुकूमशहा गब्बरसिंह' तर माधव भंडारी यांचा 'हुकूमशाहाचा वफादार सांभा' म्‍हणून पोस्‍टर लावले. शिवाय शेलार यांची 'युतीतील शकुनीमामा' म्‍हणून खिल्‍ली उडवली.
काय आहे वाद ?
> भाजपच्या 'मनोगत' पाक्षिकात माधव भंडारी यांचा एक लेख प्रकाशित झाला होता.
> यात त्‍यांनी शिवसेनेवर व्‍यंगात्‍मक टीका केली होती.
> एवढेच नाही तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना 'शोले' सिनेमातील असरानीशी केली होती.
> परिणामी, शिवसैनिकांनी 'मनोगत'चे अंक जाळले होते.
आशीष शेलारांनी दिला होता 'सामना' जाळण्याचा इशारा
यावर भाजपचे मुंबई शहराध्‍यक्ष आशीष शेलार संतप्‍त झाले होते. त्‍यांनी उत्तर म्हणून 'सामना' जाळण्याचा इशारा दिला. त्‍यानंतर शिवसेनेने 'सामना'च्‍या अग्रलेखातून शेलारांना मनोरुग्‍ण ठरवले.
भाई इतना शोर क्यू है ?
> शिवसेनेने हे आंदोलनाच्‍या वेळी रेल्‍वे स्‍थानकावर गर्दी होती.
> नेमके काय होत आहे हे पाहण्‍यासाठी रेल्‍वे स्‍थानकात येणारे - जाणारे एकमेकांना विचारत होते, 'इतना शोर क्‍यूं है भाई ?'
पुढील स्‍लाइडवर पाहा, संबंधित फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद )