आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई दहिहंडी: कोर्टाचे अादेश धाब्यावर, १९ मंडळांवर गुन्हे दाखल, अाज कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या दादर भागात उभारण्यात अालेली दहीहंडी जाेगेश्वरीच्या हिंदू एकता मंडळाने चक्क शिडी लावून फाेडली. न्यायालयाने कमाल २० फूट उंचीची मर्यादा घातल्याचा या मंडळाने असा अनाेखा निषेध नाेंदवला.  छायाचित्र: महेश टिकले. - Divya Marathi
मुंबईच्या दादर भागात उभारण्यात अालेली दहीहंडी जाेगेश्वरीच्या हिंदू एकता मंडळाने चक्क शिडी लावून फाेडली. न्यायालयाने कमाल २० फूट उंचीची मर्यादा घातल्याचा या मंडळाने असा अनाेखा निषेध नाेंदवला. छायाचित्र: महेश टिकले.
मुंबई- सर्वाेच्च न्यायालयाने २० फूट उंचीची मर्यादा घालून दिल्यानंतर हिरमुसलेल्या मुंबई- ठाण्यातील शेकडाे गाेविंदांनी गुरुवारी या निर्णयाचा निषेध करत दहीहंडीचा सण साजरा केला. तर काही ठिकाणी न्यायालयाचे अादेश धाब्यावर बसविण्यात अाले. अशा १९ मंडळांवर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात अाले अाहेत.

दादरमधील छबिलदास शाळेसमोरील मानाच्या दहिहंडीसमोर मुंबईतील सर्वच पथके प्रथेनुसार पहिली सलामी देत असतात. विशेष म्हणजे या ठिकाणी आलेल्या विविध मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. जोगेश्वरीच्या हिंदु एकता मंडळाने शिडीने चढून दहीहंडी फोडली. तर भांडूपच्या जय हनुमान पथकाने रस्त्यावर झोपून नऊ थर लावत निषेध नोंदवला. तर जोगेश्वरी येथील साईराम मित्र मंडळातील गोविंदांनी डोळ्यावर काळी पट्टी बांधून सलामी दिली. तर ठाण्यात जतन गोविंदा पथकाने तोंडात मोजपट्टी धरून सलामी देत निषेध नाेंदवला.
छायाचित्रणानुसार अाज कारवाई
मुंबई आणि ठाण्यात गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या उत्सवादरम्यान अनेक गोविंदा पथकांनी आणि आयोजकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सर्रास उल्लंघन केले. यापैकी अनेकांवर आज पोलिसांनी जरी गुन्हे दाखल केले असले तरीही एकाही गाेविंदावर कारवाई केली नाही. याबाबत विचारले असता मुंबई पोलीसांचे प्रवक्ते असलेले गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे म्हणाले, की ‘आज उत्सवाचे वातावरण पाहता कुणावरही कारवाई केली जाणार नाही. मात्र प्रत्येक ठिकाणचे छायाचित्रण पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. त्या आधारे शुक्रवारपासून कारवाईला सुरूवात केली जाईल.’
प्रतिबंधामुळे अपघाताचे प्रमाण घटले
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत गोविंदा मंडळांमध्ये जरी मोठ्या प्रमाणावर नाराजी असली तरीही न्यायालयाने मनाेऱ्याची मर्यादा २० फुटापर्यंत ठेवल्याचे चांगले परिणामही यंदाच्या उत्सवात पाहायला मिळाले. स्थानिक प्रशासन, पाेलिस, विविध ठिकाणचे आयोजक आणि गोविंदा पथकांनी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जखमी गोविंदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. गेल्या वर्षी या उत्सवादरम्यान मुंबईच्या विविध रुग्णालयातील आकडेवारीनुसार, ३६४ गोविंदा जखमी झाले होते. तर यंदा गुरुवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ७१ गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई पोलीसांच्या वतीने देण्यात आली. यापैकी ५४ गोविंदांना प्राथमिक उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले तर १७ गोविंदांवर उपचार सुरू होते.
एका गुन्ह्याने काय फरक पडताे : जाधव
ठाण्यातील नाैपाड्यात मनसेने सुमारे ४० फूट उंचावर दहीहंडी बांधली हाेती. जय जवान मंडळाने नऊ थर रचून ती फाेडली. मात्र यात सर्वाेच्च न्यायालयच्या अादेशाचे उल्लंघन झाल्याने अायाेजक अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर जाधव म्हणाले, ‘माझ्या साहेबांवर (राज ठाकरेंवर) ९२ गुन्हे दाखल आहेत. तर माझ्यावर एक गुन्हा दाखल केल्याने काय फरक पडणार?’
पुढील स्‍लाइड्सवर फोटोमधून पाहा असे रचले थरांवर थर..
बातम्या आणखी आहेत...