मुंबई - सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) याचिकेवर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याशी संबंधित सुनावणी करत असलेल्या विशेष न्यायालयाने मंगळवारी कर्जबुडवे विजय माल्ल्या यांना फरार घोषित केले. यापूर्वी 18 एप्रिलला त्यांच्या विरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते.
मद्यसम्राट मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये आहेत. ईडीने तीन समन्स बजावूनही ते मुंबईत ईडीच्या तपास अधिकाऱ्यासमोर हजर झाले नाहीत. मल्ल्यांनी तपास अधिकाऱ्यांसमक्ष हजर राहण्यासाठी मेपर्यंतची वेळ मागितली होती. पण, जूनच्या पहिला पंधरवडा पूर्ण होत आला तरीही माल्ल्या कोर्टात हजर झाले नाही. त्यामुळे र्इडीच्या मागणीचा विचार करून विशेष न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले. यापूर्वी ईडीच्या विनंतीवरून परराष्ट्र मंत्रालयाने मल्ल्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट निलंबित केला होता.
WHAT NEXT
यापूर्वी माल्या यांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी झालेला आहे. दुसऱ्या टप्प्यात त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात ईडी परराष्ट्र मंत्रालयामार्फत इंटरपोलला मल्ल्यांविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्याची विनंती करू शकते. सध्या मल्ल्या हे लंडन येथे असून, या रेड कॉर्नर नोटीसनंतर मल्ल्या यांना त्यांच्या पासपोर्टवर कुठेही प्रवास करता येणार नाही.
माल्यांनी कर्जाच्या रकमेतून खरेदी केली प्रॉपर्टी...
> विजय माल्या यांच्या यूबी ग्रुपने कर्जाच्या रकमेतून प्रॉपर्टी खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला होता. ईडीचा आरोप कोर्टाने फेटाळला आहे.
> किंगफिशर एअरलाइन्सने या आरोपांविरोधात विशेष PMLA कोर्टात आव्हान याचिका दाखल केली होती. ईडीनुसार, माल्या यांनी IDBIकडून 430 कोटी रुपये कर्ज घेतले होते. या रकमेतून माल्यांनी विदेशात प्रॉपर्टी खरेदी केली. याप्रकरणी ईडी मनी लॉन्ड्रिंगची चौकणी करत आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, बँकांना माल्यांकडून किती वसूल करायचे ?