मुंबई - वयाच्या पाचव्या वर्षीच तो घरातून पळून गेला. रेल्वे स्टेशन कचरा वेचून आपला उदरनिर्वाह करायला लागला. चहा टपरीवर काम केले. अशातच त्याच्यावर रेप झाला. नंतर त्याला ड्रग्सचे व्यसनही जडले. आता तोच मुलगा जगप्रसिद्ध लेखक आहे. त्याच्या पुस्तकाचे हक्क फ्रान्सच्या प्रकाशनाने विकत घेतले. ही संघर्षगाथा आहे अमीन शेख यांची.
का पळले घरातून ?
अमीन लहान असतानच त्यांच्या आईने दुसरे लग्न केले. ते 4 वर्षांचेच असताना त्यांच्या सावत्र वडिलांनी त्यांना एका चहा टपरीवर कामाला लावले. रोज 10 ते 12 तास काम करूनही त्यांना केवळ 2 रुपये मोबदला मिळत असे. काही चुकले, चहा सांडला किंवा उशिरा पोहोचवला तर दुकान मालक मारत असे. घरी आल्यानंतर व्यसनी सावत्र वडीलही जनावराप्रमाणे मारत. त्यामुळे त्यांच्यापासून सुटका मिळावी म्हणून अमीन यांनी घरातून पळ काढला. नंतर मुंबईच्या मलाड रेल्वे स्टेशनवर ते राहायला लागले. यात कचरा वेचून उदनिर्वाह करत.
व्यसन जडले, रेपही झाला
> या काळात शेख यांना ड्रग्ससारखे व्यसन जडले. त्यांच्यावर रेपही झाला. बालपण अक्षरश: करपून गेले.
> दरम्यान, त्यांना काही चांगले लोक भेटले. त्यांच्या संगतीने त्यांनी आपले जीवन सावरले.
> आता अमीन पूर्णवेळ अनाथ मुलांसाठी काम करतात.
> त्यांना अनाथांसाठी 'मुंबई टू बार्सिलोना' हा कॅफे सुरू करायचा आहे.
कसे झाले लेखक
> अमीन आता जगप्रसिद्ध लेखक आहेत. एका व्यक्तीला त्यांच्या जीवनाबद्दल कळाले तर त्याने त्यांना पुस्तक लिहिण्याचा सल्ला दिला.
> त्या नंतर त्यांनी 11 महिन्यांमध्ये 'बॉम्बे - लाइफ इज लाइफ, आय एम बिकॉज ऑफ यू' हे पुस्तक लिहिले आणि ते स्वत: प्रकाशित केले.
> पुढे फ्रान्सच्या मेरिलिजने त्याचे कॉपीराईट विकत घेतले.
जीवनात कसा घडला बदल
> लहान असताना अमीन यांची भेट सिस्टर सेराफिन यांच्याशी झाली. त्या त्यांना 'स्नेहसदन' अनाथालयात घेऊन गेल्या. त्या ठिकाणी त्यांना फादर प्लॅसी भेटले.
> प्रेम काय असते, जिव्हाळा कसा असतो, याची प्रचिती पहिल्यांदा या आनाथ आश्रमात आल्याने त्यांनी सांगितले.
> दरम्यान, त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये प्रार्थना म्हणावी लागे. मला इंग्रजी येत नव्हती. त्यामुळे मी तिथून पळ काढला, असे अमीन यांनी सांगितले.
भीकही मागितली
> आनाथआश्रमातून पळ काढल्यानंतर काही दिवस भीख मागितली.
> पण, सिस्टर सेराफिन आणि फादर प्लॅसी यांनी शोधून काढले आणि पुन्हा आनाथआश्रमात घेऊन गेले.
> वयाच्या 16 वर्षी मी वर्तमानपत्रांचा स्टाल सुरू केला.
> पुढे प्रसिद्ध आर्टिस्ट यूस्टेस फर्नांडिस ('अमूल'चे लेखक ) हे मला त्यांच्या घरी घेऊन गेले. तिथे घरगडी म्हणून मी काम करत होते. त्यांच्याकडेच मी इंग्रजी शिकलो.
पुढील स्लाइड्वर वाचा, अमीन यांच्याविषयी अजून माहिती आणि पाहा संबंधित फोटोज...