आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Underworld: मुंबईतील या लेडी डॉनने घातली होती नेहरुंना लग्‍नाची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देश स्‍वातंत्र्यापासूनच मुंबई आणि अंडरवर्ल्‍ड यांचे नाते दृढ आहे. पण, अंडरवर्ल्‍डमध्‍ये केवळ दाऊद, हाजी मस्तान, अरुण गवळी या आणि इतर पुरुष डॉनचा दबदबा नव्‍हता तर अनेक महिलांनीसुद्धा ही मायानगरी (मुंबई) गाजवली. या महिलांच्‍या नावाने अनेकांचा थरकाप उडत असे. या 'हसिन माफियां'मध्‍ये गंगूबाई कठेवाली ही पहिला महिला डॉन.
गंगुबाईने स्‍वतंत्र भारतात साठच्‍या दशकात मुंबई गाजवून सोडली. मुंबईतील रेड लाइट एरिया कामठीपुरा येथील सर्वात मोठ्या कुटुंखान्‍याची ती मालकीन होती. वेश्‍यांची नेता म्‍हणून तिचा आजही उल्‍लेख केला जातो. वेश्‍यांच्‍या एका आंदोलनादरम्‍यान तिने तत्‍कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना थेट लग्‍नाची मागणी घातली. त्‍यामुळे नेहरू अचंबित झाले होते, हा प्रसंग प्रसिद्ध विचारवंत तथा पत्रकार एस. हुसैन जैदी यांच्‍या Mafia Queens of Mumbai या पुस्‍तकात आहे.
कोण आहे गंगूबाई कठेवाली ?
मुंबईतील सर्वात मोठी वेश्‍यावस्‍ती असलेल्‍या कामाठीपुऱ्यात गंगुबाईचा दरारा होता. या ठिकाणी गंगुबाईचा शब्‍द अंतिम मानला जाई. तिला मान सन्‍मान होता. त्‍यामुळेच आजही येथे गंगुबाईचा मोठा फोटो पाहायला मिळतो. येथे अम्‍मा या नावाने तिला ओळखले जाई. वेश्‍यांच्‍या हक्‍कासाठी लढणारी ती स्‍वतंत्र भारतातील पहिली महिला होता. डॉन करीम लाला याने तिला बहीण मानले होते. काठियावाड असल्‍याने ती स्‍वत:ला कोठेवाली नाही तर कठेवाली म्‍हणून घेई. ती अत्‍यंत कमी वयात कमाठीपुऱ्यातील कोठेवाली बनली होती. विशेष म्‍हणजे यासाठी तिला वेश्‍यांनी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन निवडून दिले होते. तिने वेश्‍यांच्‍या हक्‍कांसाठी मुंबईतील आजाद मैदानावर सभा घेऊन जाहीर भाषण केले होते. मुलींची तस्‍करी, अंमली पदार्थांची विक्री, धमकी, लुटमार असे अनेक गंभीर गुन्‍हे तिच्‍यावर दाखल होते.
पुढील स्‍लाइडवर वाचा,
- नेहरूजींना पटवून दिले समाजाला वेश्‍यांची गरज का ?
- कशी घातली पंतप्रधान नेहरूजींना लग्‍नाची मागणी ?
- गंगुबाई कशी झाली वेश्‍या ?