आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumtaz Shaikh Of Right To Pee In Bbcs 100 Influencial Women

एकेकाळी होती शोषित, पीडित; आज जगातील 100 महत्‍त्वाकांक्षी महिलांच्‍या यादीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बीबीसी या वृत्‍तसंस्‍थेने जगातील 100 महत्‍त्वाकांक्षी महिलांची यादी जाहीर केली. यामध्‍ये भारतातील गायिका आशा भोसले, टेनिस खेळाडू सानिया मिर्जा, प्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल यांच्‍यासह मुंबईतील अत्‍यंत गरीब कुटुंबातून आलेल्‍या मुमताज शेख या सामाजिक कार्यकर्तींचाही समावेश आहे. त्‍या अनुषंगाने आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत मुमताज कोण आहे आहेत, त्‍यांचे कार्य काय आहे, या बद्दल विशेष माहिती...
वडील होते गुन्‍हेगारी प्रवृत्‍तीचे
मुमताज यांचा जन्‍म एका गरीब कुटुंबात झाला. त्‍यांचे वडील गुन्‍हेगारी प्रवृत्‍तीचे होते. दारूच्‍या नशेत ते रोज त्‍यांच्‍या आईला मारझोड करत असत. तिच्‍या घरात एकूण सात सदस्‍य होते. परंतु, वडिलांकडून काहीच आर्थिक मदत मिळत नव्‍हती. त्‍यामुळे अनेक वेळा मुमताज यांना उपाशी झोपावे लागले. पुढे त्‍यांच्‍या मामाने वयाच्‍या बालवयातच मुमताज यांचे लग्‍न लावून दिले. वयाच्‍या अवघ्‍या 16 व्‍या वर्षी त्‍यांनी एका गोंडस मुलीला जन्‍म दिला. पण, त्‍यांचा पतीही वडिलांप्रमाणेच त्‍यांचा आणि मुलीचा छळ करत होता. त्‍यांना घराच्‍या बाहेर जाण्‍यास बंदी होती. त्‍यांनी कायम बुरख्‍यातच राहावे, अशी सक्‍ती त्‍याने केली होती.

पुढील स्‍लाइडवर वाचा, समाजकार्याला अशी झाली सुरुवात...