आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किंगफिशर हाऊसला कुणीच खरेदीदार नाही, १५० कोटी रुपये होते राखीव बोलीमूल्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सचे एकेकाळचे मुख्यालय असलेले मुंबईतील किंगफिशर हाऊस आज लिलावात मांडण्यात आले. त्यासाठी १५० कोटी रुपयांचे राखीव बोलीमूल्य ठेवण्यात आले होते. मात्र, त्यावर एकही बोली लागली नाही.

मुंबईतील विलेपार्ले भागात तब्बल १७ हजार चौरस फुटांवर हे किंगफिशर हाऊस उभारण्यात आलेले आहे. मुंबईतील राष्ट्रीय विमानतळापासून ते जवळच आहे. त्याची लिलाव प्रक्रिया सकाळी साडेअकरा वाजता सुरू झाली. तथापि, एक तासभर वाट पाहिल्यानंतरही कुणीच बोली लावली नाही. या इमारतीचे राखीव मूल्य १५० कोटी रुपये असल्याने खरेदीदार फिरकला नसल्याचे सांगितले जाते.