मुंबई -मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला अभिनेता आमीर खान याने सोमवारी देशातील असुरक्षितेच्या वातावरणावर चिंता व्यक्त केली. तो महणाला होता, ''मुलाबाळांच्या सुरक्षिततेने चिंतित पत्नी (किरण)ने एकदा तर देशच सोडून जाऊ, असे आपल्याला म्हटले होते'' . त्याच्या या विधानामुळे त्याच्यावर चौफेर टीका होत आहे. दरम्यान, यात आता शिवसेनेनेही उडी घेतली असून, पक्षाचे मुखपत्र 'सामाना'च्या अग्रलेखातून अमीरला ‘बाईलबुद्ध्या, इडियट रणछोडदास’ अशा शिव्या घातल्या. शिवाय 'आमीरला कोणत्या कारणांमुळे देशातून पळून जावेसे वाटले व या बाईलबुद्ध्याने ‘मातृभूमीस’ टांग मारून फिल्मी बायकोचे सांगणे इतके मनावर का घ्यावे हे त्याचे त्यालाच माहीत, ' असेही शिवसेनेने म्हटले.
नेमके काय आहे 'सामाना'च्या अग्रलेखात
सामानाच्या अग्रलेखात म्हटले, 'मुळात देश सोडून जाण्याची भाषा ही बेइमानीची आहे. या देशाने जे वैभव दिले ते सर्व इकडच्या इकडेच ठेवा. भारत हा देश राहण्यालायक वाटत नसेल तर हे ‘इडियट रणछोडदास’ कोणत्या देशात जाणार आहेत? ज्यांना हा देश आपला वाटत नाही त्यांनी उगाच देशभक्तीच्या व ‘सत्यमेव जयते’च्या वल्गना करू नयेत,' असा सल्लाही यात दिला.
पुढील स्लाइडवर वाचा, शाहरुखवरही केली टीका