आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथीतील विद्यार्थिनीवर तीन शिक्षकांनी केला बलात्‍कार, मुंबईतील प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतीकात्‍मक छायाचित्र
मुंबई - तिचे वय झोपाळ्या वाचून झुलण्‍याचे. कळीप्रमाणे उमलण्‍याचे. पण, फूल होण्‍यापूर्वीच या कळीला तिच्‍याच एक नव्‍हे तर तीन शिक्षकांनी कुस्‍करून टाकले. मागील वर्षभरापासून ते सातत्‍याने तिच्‍यावर बलात्‍कार करत आहेत. ही आपबिती आहे मीरा रोडवरील एका शाळेत शिकणाऱ्या इयत्ता चौथीतील विद्यार्थिनीची.
पोलिसांनी केले तीनही शिक्षकांना अटक
पीडित मुलीचे वय अवघे नऊ वर्षांचे आहे. मात्र, वडिलासमान असलेल्‍या तीन शिक्षकांनी तिचे लैंगिक शोषण केले. पोलिसांनी या प्रकरणी शारीरिक शिक्षक संजय पाटील (46), कला शिक्षक जितेंद्र जाधव (23) आणि नीलेश भोईर (47) यांना अटक केली. त्‍यांच्‍या विरुद्ध मीरा रोड पोलिस ठाण्‍यात भारतीय दंडविधान कलम 376, 323, 504, आणि पोस्को कायदा 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करण्‍यात आला.

पुढील स्‍लाइडवर वाचा, शिक्षकांनी कसे केले लैंगिक शोषण...