आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मग्न तळ्याकाठी’ नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर, चंद्रकांत कुलकर्णी सर्वोत्‍कृष्‍ट दिग्‍दर्शक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'अमर फोटोस्टुडिओ\' या निपूण धर्माधिकारी दिग्‍दर्शित नाटकाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. - Divya Marathi
\'अमर फोटोस्टुडिओ\' या निपूण धर्माधिकारी दिग्‍दर्शित नाटकाने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
मुंबई- २९ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत जिगिषा आणि अष्टविनायक, मुंबई यासंस्थेच्या ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकास रु. सात  लाख ५०  हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली अाहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे : ‘कोड मंत्र’ या नाटकास ४ लाख ५० हजाराचे द्वितीय पारितोषिक आणि ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकास ३ लाखाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
 
या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे:
 
नाटक
द्वितीय पारितोषिक - अनामिका+रसिका प्रॉडक्शन्स, मुंबई या संस्थेच्या 'कोड मंत्र' या नाटकास 4 लाख 50 हजार रुपयांचे द्वितीय पारितो‍षिक जाहीर झाले आहे.
तृतीय पारितोषिक - सुबक, मुंबई या संस्थेच्या 'अमर फोटोस्टुडिओ' या नाटकास रु. 3 लाखांचे हे पारितोषिक जाहीर झाले आहे.
 
दिग्दर्शन
प्रथम पारितोषिक -  चंद्रकांत कुलकर्णी (नाटक-मग्न तळयाकाठी), (रु.1,50,000/-)
द्वितीय पारितोषिक-  राजेश जोशी (नाटक-कोडमंत्र) (रु.1,00,000/-)   
तृतीय पारितोषिक -  निपुण धर्माधिकारी (नाटक-अमर फोटोस्टुडिओ), (रु.50,000/-)
 
नाट्यलेखन
प्रथम पारितोषिक- मनस्विनी लता रविंद्र (नाटक-अमर फोटो स्टुडिओ), (रु.1,00,000/-)
द्वितीय पारितोषिक- महेश एलकुंचवार (नाटक-मग्न तळयाकाठी) (रु.60,000/-)
तृतीय पारितोषिक - विजय निकम (नाटक-कोडमंत्र), (रु.40,000/-)
 
प्रकाश योजना
प्रथम पारितोषिक- रवि रसिक (नाटक-मग्नतळयाकाठी), (रु.40,000/-)
द्वितीय पारितोषिक- भोतेश व्यास (नाटक-कोडमंत्र), (रु.30,000/-)  
तृतीय पारितोषिक - योगेश केळकर (नाटक-किमयागार), (रु.20,000/-)
 
नेपथ्य
प्रथम पारितोषिक -  प्रसाद वालावलकर (नाटक-कोड मंत्र), (रु.40,000/-)
द्वितीय पारितोषिक - प्रदिप मुळये (नाटक-मग्न तळयाकाठी), (रु.30,000/-)
तृतीय पारितोषिक - प्रदिप मुळये (नाटक-अमरफोटो स्टुडिओ), (रु.20,000/-)
 
संगीत दिग्दर्शन
प्रथम पारितोषिक -  आनंद मोडक व राहुल रानडे (नाटक-मग्न तळयाकाठी), (रु.40,000/-)
द्वितीय पारितोषिक - सचिन जिगर (नाटक-कोडमंत्र), (रु.30,000/-)
तृतीय पारितोषिक-  राहुल रानडे (नाटक-बंध-मुक्त), (रु.20,000/-)
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, वेशभूषा, रंगभूषा आणि उत्‍कृष्‍ट अभिनयाचे पारितोषिक कोणी पटकावले...
बातम्या आणखी आहेत...