आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिमा इंगोले, प्रभा गणोरकर, गज्वी यांना वाङ‌्मय पुरस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सन२०१५ या वर्षातील उत्कृष्ट साहित्य निर्मितीचे राज्य सरकारचे मराठी वाङ््मय पुरस्कार गुरुवारी जाहीर झाले. कवयित्री प्रभा गणोरकर यांचे ‘व्यामोह’, नाटककार प्रेमानंद गज्वी यांचे ‘सगुण निर्गुण’, कवयित्री प्रतिमा इंगोले यांचे ‘हॅट्रिक’, हेरंब कुलकर्णी यांचे ‘कृष्णमूर्ती स्कूल’, प्रकाशक रामदास भटकळ यांचे पाॅप्युलर रीतिपुस्तक, विचारवंत दिलीप धोंडगे यांचे ‘तात्पर्य’ अादी विविध साहित्य प्रकारांतील ३५ पुस्तकांना हे पुरस्कार जाहीर झाले. एक लाख ते ५० हजार असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

>काव्य: केशवसूत पुरस्कार, प्रभा गणोरकर (व्यामोह, पॉप्युलर प्रकाशन) >प्रथम प्रकाशन काव्य : बहिणाबाई चौधरी पुरस्कार, इग्नेशियस डायस (अधांतराला लटकलेल्या अवतरणात).
>वाङ््मय-नाटक/ एकांकिका, राम गणेश गडकरी पुरस्कार, रमेश नाईक (ती एक अहिल्या होती)
>प्रौढ वाङ््मय कादंबरी : हरी नारायण आपटे पुरस्कार, बा. भो. शास्त्री, झांजर (चिंतनी प्रकाशन, करमाड, जि.औरंगाबाद)
>प्रथम प्रकाशन -कादंबरी, ना. पेंडसे पुरस्कार, िनतीन थोरात (सूर्याची सावली) >लघुकथा: दिवाकर कृष्ण पुरस्कार, प्रकाश बाळ जोशी {प्रथमप्रकाशन लघुकथा : ग. ल. ठोकळ पुरस्कार, ऋषिकेश वांगीकर (कथास्तु, शब्द मल्हार प्रकाशन, नाशिक), >ललितगद्य: अनंत काणेकर पुरस्कार, प्रेमानंद गज्वी, {प्रथमप्रकाशन ललित गद्य : ताराबाई शिंदे पुरस्कार, संदेश कुलकर्णी
>विनोद: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार, प्रतिमा इंगोले,
>चरित्र:न. चिं. केळकर पुरस्कार, सुहास बहुळकर (आयुष्याची मौल्यवान माती : िशल्पकार करमरकर),
>आत्मचरित्र: लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, डॉ. उज्ज्वला सहाणे, (प्रेरणा साउंड ऑफ सायलेन्स),
>समीक्षा/ वाङ््मयीन संशोधन / सौंदर्य शास्त्र / ललितकला आस्वादपर लेखन : के. क्षीरसागर पुरस्कार, सुधीर रसाळ (मर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्लेषण), >प्रथमप्रकाशन - समीक्षा सौंदर्यशास्त्र : रा. भा. पाटणकर पुरस्कार, राजेंद्र सलालकर, (रंगनाथ पठारे यांच्या साहित्यातील स्त्री-दर्शन),
>राज्यशास्त्र / समाजशास्त्र : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, रमेश पतंगे (सामाजिक न्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साप्ताहिक विवेक मुंबई), {इतिहास: शाहू महाराज पुरस्कार : संजीवनी खेर, (सर्वसाक्षी),
>भाषाशास्त्र/ व्याकरण- नरहर कुरंदकर पुरस्कार : रामदास भटकळ मृदुला प्रभुराम जोशी,(पॉप्युलर रीतिपुस्तक)
>विज्ञानतंत्रज्ञान : महात्मा जोतिराव फुले पुरस्कार, रमेश नारायण वरखेडे, (सायबर-संस्कृती, इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज इंजिनिअरिंग, नाशिक.)
>शेती शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह, वसंतराव नाईक पुरस्कार, डॉ. नितीन मार्कण्डेय,
>अर्थशास्त्र विषयक लेखन, सी. डी. देशमुख पुरस्कार, डॉ.श्रीराम पेडगावकर, (नांदेड), >तत्त्वज्ञान मानसशास्त्र, ना.गो.नांदापूरकर पुरस्कार, दिलीप धोंडगे (तात्पर्य ), >शिक्षणशास्त्र: कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, हेरंब कुलकणी, (जे. कृष्णमूर्ती स्कूल्स),
>पर्यावरण: डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार, बी. के. कुलकर्णी, (पर्यावरण), अनुवादित : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार, अनुवादक अश्विनी भिडे - देशपांडे, (मादाम क्युरी),
>संकीर्ण(क्रीडासह), भाई माधवराव बागल पुरस्कार, डॉ. गिरीश प. जाखोटिया, (डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि एकविसावे शतक).
> बाल वाङ््मय संकीर्ण, ना.धो. ताम्हणकर पुरस्कार, मधुकर धर्मापुरीकर (अनकॉमन मॅन, आर. के. लक्ष्मण).

>बालवाङ््मय कविता : बालकवी पुरस्कार, ज्ञानदा आसोलकर (पाऊस माझा साथीदार, स्पर्श प्रकाशन, राजापूर, जि. रत्नागिरी) बाल वाङ््मय - कादंबरी : साने गुरुजी पुरस्कार, डॉ.भारती सुदामे (खजिन्याची विहीर, ऋचा प्रकाशन, नागपूर),
>बालवाङ््मय- कथा (छोट्या गोष्टी, परीकथा, लोककथांसग्रह) राजा मंगळवेढेकर पुरस्कार, डॉ. सुमन नवलकर, (वजनदार, व्यास क्रिएशन्स, ठाणे )
>बालवाङ््मय (छंद शास्त्रे), यदुनाथ थत्ते पुरस्कार, राजीव तांबे (गंमत शाळा भाग ३, राजहंस प्रकाशन, पुणे)
>सरफोजीराजेभोसले, बृहन्महाराष्ट्र पुरस्कार, सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार, अनंत - तनया- डॉ. माणिक बेंगेरी, (भर्तृहरी ते अवैय्यार - सारे एकाच तत्त्वाचे धनी, शांभवी पब्लिकेशन, म्हैसूर).
बातम्या आणखी आहेत...