आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi TV Actress Held \'captive\' By Rajasthan Producer

निर्मात्याने 3 महिने डांबून ठेवले, अखेर बाळासाहेबांनी सोडवले- मराठी अभिनेत्रीचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एका राजस्थानी निर्मात्याने मला चित्रपटाचे शुटिंग करण्याच्या निमित्ताने तीन महिने राजस्थानमध्ये कैद करून ठेवले होते. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मदतीमुळे माझी सुखरूप सुटका झाली होती, असा खबळबळजनक दावा मराठी सिनेसृष्ठीतील अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी सोमवारी केला. अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी या घटनेबाबत तब्बल 20 वर्षानंतर खुलासा केला असला तरी त्यांनी निर्मात्याचं नाव आणि घटनास्थळाबाबत माहिती दिलेली नाही.
नाटक, मालिकांमध्ये विविध भूमिका साकारणा-या सुप्रिया या ठाण्यात आयोजित केलेल्या 'महिला सुरक्षा परिसंवादा'दरम्यान त्या बोलत होत्या. सुप्रिया पाठारे म्हणाल्या, 1995 मध्ये एक निर्माता सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने मला राजस्थानला घेऊन गेला आणि तिथे तीन महिने 'कैद' करून ठेवले. त्या शूटिंगसाठी मी एकटीच गेले होते. सोबत कोणीही मराठी कलाकार नव्हते. त्याकाळी मोबाईल वगैरे फारसे नव्हते. होते लॅंडलाईन फोन. त्यामुळे निर्माता मला फोन करून देत नसत. पुढील तीन महिने निर्मात्याने बंदुकीच्या धाकावर माझ्याकडून अभिनय करवून घेतला. मला तिथल्याच एका परिसरात ठेवण्यात आले होते, असे पाठारे यांनी सांगितले.
'काही दिवसांनी माझ्या कुटुंबियांशी फोनवरुन संवाद साधण्याची परवानगी दिली मात्र तेही हिंदीतून व त्याच्यासमोरच बोलण्याची. मराठीत बोलायचे नाही असा त्याने दम भरला होता. मात्र, मी माझ्या बहिणीला याबाबत कसंतरी गुप्त माहितीद्वारे सर्व परिस्थिती कळवली. त्यानंतर माझ्या कुटुंबियांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मदतीची याचना केली. बाळासाहेबांनी याबाबत लागलीच हस्तक्षेप करून माझ्या सुटकेसाठी सूत्रे हालवली. बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन राजस्थान पोलिसांचे एक भलेमोठे पथकाने या प्रकरणाचा तपास केला व आठवड्याभरातच राजस्थान पोलिस माझ्या शोधासाठी आले व माझी सुटका केली. घरी आल्यानंतर माझ्या घरच्यांनी बाळासाहेबांच्या हस्तक्षेपामुळे तुझी सुटका झाल्याचे सांगितले. राजस्थानमधून 20 तासांचा प्रवास करून सुरतला पोहचले. त्यावेळी माझ्याकडे अवघे 12 रूपये उरले होते. पण सुखरूप सुटकेसाठी बाळासाहेबांची मी आयुष्यभर ऋणी राहीन' असे सुप्रिया यांनी सांगितले.