आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Youth Strated म मराठीचा You Tubechannel Today

मराठी भाषा दिन विशेष: 'म मराठीचा' यू-ट्यूब वाहिनी तरूणाईकडून सुरु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आज महाराष्ट्रासह तमाम मराठी बांधव 'मराठी दिवस' साजरा करीत आहेत. कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण हा दिवस साजरा करतो. हेच औचित्य साधून मुंबईतील मराठी तरूण-तरूणींनी एक उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या तरूणाईच्या पुढाकारामुळे आजपासून 'म... मराठीचा' ही मराठमोळी यूट्युब वाहिनी आपल्या सेवेत दाखल झाली आहे.
महाराष्ट्रातील तरूणांनी मराठी भाषा व साहित्यात रमावे यासाठी मुंबईकर तरूणी व कवयित्री यामिनी दळवी हिच्यासह काही तरूणांनी हा उपक्रम सुरु केला आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य, कला आदींबाबत माहिती यात मिळणार आहे. यामिनी दळवींसह पूजा भांडगे, अमोल शिंदे, प्रसाद हावळे, शशिकांत कोळ, लीना दातार, प्रथमेश तुंगावकर आदी तरूणाई एकत्र आली आहे व मराठीचा प्रसार करण्यासाठी जोडले गेले आहेत. ही मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करत असूनही मराठी भाषा सुदृढ व्हावी यासाठी एकत्र आली आहेत.
ही तरूणाई यापुढे दर महिन्याच्या 27 तारखेला या यूटय़ूब वाहिनीवर नवा माहितीपट सादर करेल. आजच्या पहिल्या दिवशी या वाहिनीवर कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्यावर आधारित माहितीपट सादर करण्यात आला आहे. या माहितीपटात जेष्ठ कवींच्या मुलाखती घेतल्या आहेत. तसेच कुसुमाग्रजांच्या कवितांचा समावेश असणार आहे. अशोक बागवे, अरुण म्हात्रे यांच्या मुलाखतींचाही यात समावेश असेल. हा माहितीपट विद्यार्थ्यांपर्यंत जावा म्हणून मुंबई-पुण्यातील शाळांत दाखवला जाणार आहे.
पुढे पाहा, आज सादर केलेला कुसुमाग्रज यांच्यावरील माहितीपट...