आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathwada Agriculture University Renamed Vasantrao Naik, Minister Of Council Decision

वसंतराव नाईक यांचे मराठवाडा कृषी विद्यापीठाला नाव; मंत्रिमंडळाचा निर्णय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नाव 'वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी' असे करण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या निर्णयानुसार, मराठवाडा कृषी अधिनियमात अध्यादेशाद्वारे दुरुस्ती करण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी सांगितले.


माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे हरितक्रांती व कृषी क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन या जन्मशताब्दी वर्षातच त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे मराठवाडा कृषी विद्यापीठाला त्यांचे नाव देण्याचे ठरले. मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना 18 मे 1972 रोजी झाली होती. या विद्यापीठामध्ये कृषी व संलग्न विषयातील शिक्षण, विस्तार शिक्षण व बीजोत्पादन या विषयांवर प्रामुख्याने काम केले जाते. मागील 20 वर्षांपासून विद्यापीठाला वसंतरावांचे नाव देण्याची मागणी होत होती. 20 वर्षांच्या संघर्षानंतर यश.