आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील विकास योजनांचा निधी खर्च नाहीच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठवाड्यातील विकासासाठी योजना आणि बिगर योजना वर्गातील कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला नसल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. नांदेड जिल्हय़ातील लोह्याचे राष्ट्रवादीचे आमदार शंकर धोंडगे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली आहे.

मराठवाड्याच्या विकासाची गती वाढवण्यासाठी सन 2008 मध्ये 1853 कोटी रुपयांचा विकास कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. हा कार्यक्रम दोन वर्षांसाठी होता. मात्र हा कार्यक्रम दोन वर्षांत पूर्ण होऊ न शकल्याने त्याला आणखी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती.

कालावधी वाढवूनही निधी खर्च नाही
या मराठवाडा विकास कार्यक्रमांतर्गत योजना आणि बिगर योजनांसाठी विविध स्रोतांच्या माध्यमातून खर्च होणे अपेक्षित होते. मात्र योजनेचा कालावधी वाढवूनही निधी पूर्ण खर्च झाला नाही. 1853 कोटी रुपयांमधील केवळ 1522 कोटी 83 लाख रुपये खर्च झाला असून 325 कोटी अद्यापही खर्च झाले नसल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.