आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathwada Development Mandal Issue, News In Marathi

मराठवाडा वैधानिक विकास मंडळास 111 कोटी मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी, दलित, मागासवर्गीय अशा विविध घटकांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने तब्बल 20 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर केल्या. यात मराठवाडा वैधानिक विकास महामंडळास 111 कोटी, विदर्भ वैधानिक विकास मंडळास 397 कोटी तर उर्वरित वैधानिक विकास मंडळास 621 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात केज येथील एसटी बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी 1 कोटी तर औरंगाबाद विभागात डिजिटल कम्युनिकेशन नेटवर्कसाठी 4 कोटी 61 लाख मंजूर करण्यात आले आहेत.
शेतकर्‍यांच्या वीज बिल माफीसाठी दीड हजार कोटी, गारपीटग्रस्तांसाठी दोन हजार सहाशे कोटी,
टोल नाके बंद करण्यासाठी 389 कोटी देण्याची तरतूद

गुरुवारी सादर पुरवणी मागण्यात नाही. विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने अशाच प्रकारे 30 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या. 2013-14 या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पाव्यतिरिक्त तीन वेळा पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. त्या 21 हजार कोटींच्या होतात. मात्र गुरुवारी पुढील केवळ तीन महिन्यांसाठी सादर पुरवणी मागण्या 20 हजार कोटींहून अधिक आहेत. राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात 1 लाख 18 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. आता त्यात 20 हजार कोटींच्या खर्चाची भर पडल्याने निवडणुकीच्या तोंडावर सरकारने तिजोरी उघडल्याचे मान्य केले तरी कर्जबाजारी राज्याला ही दौलतजादा परवडणारी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चैत्यभूमी स्मारक : निधी नाहीच
अरबी समुद्रात शिवाजी महाराज स्मारकासाठी 93 कोटी, कोल्हापूर येथील माणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या संयुक्त स्मारकासाठी 10 कोटींची तरतूद आहे. मात्र, चैत्यभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी तरतूद नाही.

राज्य सरकार 3 महिन्यांत खर्च करणार 20 हजार कोटी

शिष्यवृत्तीसाठी 279 कोटी
भटक्या-विमुक्त प्रवर्गातील विद्यार्थ्यांची थकीत शिक्षण शुल्कापोटी 50 कोटी, विशेष मागास विद्यार्थी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी 100 कोटी, इतर मागासवर्गियांच्या थकित शिष्यवृत्तीपोटी 100 कोटी व यंदा शिष्यवृत्तीसाठी 75 कोटींची तरतूद आहे. अपंगांच्या कल्याणासाठी 75 कोटी दिले.

प्रसिद्धीसाठी 93 कोटी
सरकारने राबवलेल्या योजनांची आघाडीची वर्तमानपत्रे, दूरचित्रवाहिन्या,एसटी आणि बेस्ट बसेस यांच्या माध्यमातून तसेच फलक लावून जाहिराती करण्यात येतील, अशी सरकारची 93 कोटी 27 लाख खर्च करून विशेष प्रसिद्धी करण्याची योजना आहे. शिवस्मारकासाठी मात्र 93 कोटीच देण्यात आले आहेत.
पुरवणी मागण्यांत समावेश नाही
1500 कोटी यंत्रमाग, कृषी पंपाच्या वीज बिल माफीसाठी
665 कोटी गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी
389 कोटी बंद केलेल्या 44 टोलनाके कंत्राटदारांना द्यावयाच्या रकमेसाठी

याचा समावेश
2452 कोटी अन्नसुरक्षेसाठी
5000 कोटी विधानसभा निवडणूक आणि नाशिक सिंहस्थ कुंभमेळा या काळात कायदा-सुव्यवस्थेसाठी