आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार हजार गावांना दुष्काळापासून सुरक्षा कवच; राबवणार शेती तंत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अलीकडील काळात हवामानात बदल झाल्यामुळे राज्यातील कृषी क्षेत्रापुढे आव्हान उभे राहिले आहे. या हवामान बदलाचा सामना करताना मराठवाडा व विदर्भातील चार हजार गावांना दुष्काळापासून सुरक्षा कवच मिळेल. या दुष्काळी स्थितीचा अभ्यास करून त्यानुसार शेती तंत्र राबवण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीतून ४ हजार कोटी खर्च करून हवामान अनुकूल कृषी प्रकल्प राबवण्यात येणार आहेत.

पावसाचे असमान वितरण, दाेन पावसातील खंड, मान्सूनचे उशिरा हाेणारे अागमन, अवकाळी पाऊस, गारपीट तसेच दुष्काळामुळे राज्यातील कृषी उत्पादनात माेठ्या प्रमाणावर घट झाली. हवामानातील बदलांचा सर्वाधिक फटका बसलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील काही निवडक दुष्काळग्रस्त गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील ९०० गावांमध्ये हवामान अनुकूल कृषी प्रकल्प राबविण्यात येत असल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हवामानाचा लहरीपणा राेखणे अापल्या हाती नसले तरी वारंवार दुष्काळाच्या कचाट्यात सापडणाऱ्या राज्यातील गावांना एकप्रकारे सुरक्षा कवच पुरवण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

असा असेल प्रकल्प
> संबंधित गावांमधील हवामान, दुष्काळ, शेती, शेती उत्पन्नाचा अभ्यास करून हवामानाला अनुकूल विशिष्ट प्रकारची कृषी प्रणाली तयार करणार
> गेल्या दहा वर्षांमध्ये विशिष्ट गावात वारंवार दुष्काळ पडणाऱ्या गावांना प्राधान्य देणार
> जलयुक्त शिवारच्या धर्तीवर जलसाठे, शेततळी, सूक्ष्म सिंचन सुविधा
>{ शेतातील ओलावा टिकवून ठेवणाऱ्या विविध तंत्रज्ञानाचा वापर
> दुष्काळात पाण्याचा ताण सहन करणाऱ्या प्रजाती उपलब्ध करणार
>निवडलेल्या गावांचे वॉटर बजेटिंग
> विदर्भातील खारपाण पट्ट्यातील गावातील शेतीचे शाश्वत शेती व्यवसायात रूपांतर { सर्वाधिक बाधित गावांचा पाणलाेेट क्षेेत्राशी सुसंगत समूहगट करणार.

या भागाचा समावेश
दुष्काळापासून संरक्षित करण्यात येणाऱ्या गावांमध्ये मराठवाड्यातील ३००० गावांचा समावेश असून विदर्भाच्या सहा िजल्ह्यांतील १००० गावांचा समावेश अाहे. विदर्भातील पूर्णा नदीच्या खाेऱ्यातील अमरावती, अकाेला, बुलडाणा िजल्ह्यातील खारपाणी पट्ट्यातील ९०० गावांचा समावेश अाहे.
बातम्या आणखी आहेत...