आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळी मराठवाड्यात स्वतंत्र आपत्कालीन नियोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - धरणांमध्ये अवघा सात टक्के पाणी साठा शिल्लक राहिलेल्या मराठवाडा विभागात पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. बीड, उस्मानाबाद आणि लातूरच्या िबकट िस्थतीबाबत स्वतंत्र आपत्कालीन नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत िदल्याची माहिती सूत्रांनी िदली.

फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत राज्यातील पीक पाण्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली. मराठवाड्यातील सर्व सिंचन प्रकल्पातील सिंचन साठा केवळ ७ टक्के इतकाच शिल्लक आहे. त्यामुळे पिण्याच्या पाणी तसेच जनावरांच्या चाऱ्याचे संकट िनर्माण झाले आहे. त्यामुळे रेल्वे वॅगनच्या साह्याने पाणीपुरवठा करण्याबरोबरच चारा डेपो किंवा छावण्यांचा निर्णय तातडीने घेण्यात यावा, अशी मागणी काही मंत्र्यांनी केली. यासंदर्भात मंत्रिमंडळ समितीला अधिकार देण्यात आले असून समिती योग्य निर्णय घेईल. यासाठीच आपण आपत्कालीन स्वतंत्र िनयाेजन करण्याच्या सूचना िदल्या आहेत, असे फडणवीस यांनी बैठकीत सांिगतल्याची माहिती अाहे.

पाणलाेट क्षेत्रांत पाऊस पाडा!
टंचाईग्रस्त भागांमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याचे काम सुरू असून हा प्रयोग ६० टक्के यशस्वी झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. मराठवाड्यातील धरणांच्या पाणलाेट क्षेत्रांमध्ये पाऊस पाडण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी िदल्याचे सूत्रांनी सांिगतले.

बीडला सर्वाधिक टँकर
राज्यात १७५१ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा हाेत आहे. त्यात सर्वाधिक ५०६ टंॅकर बीडला, १४८ टंॅकर उस्मानाबादला तर ९६ टंॅकरने लातूर जिल्ह्यात अाहेत.