आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात यंदाही भीषण पाणीसंकट!, मागील दोन वर्षांपेक्षा कमी पाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो - प्रतिकात्मक
मुंबई- मराठवाड्यात दोन आठवड्यांपूर्वी पडलेल्या पावसाने राज्य सरकार समाधानी असले तरी मराठवाड्याची पाणी समस्या सुटलेली नसून येत्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मांजरा, माजलगाव धरणात शून्य टक्के साठा असून निम्न तोरणा, सिना कोळेगावमध्ये कमी पाणी असल्याने नागरिकांना पाणी कसे पुरवायचे, असा प्रश्न सरकारपुढे आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदा कमी पाऊस झाल्याने ही स्थिती उद्भवली.
२९ सप्टेंबर रोजी मराठवाड्याच्या मोठ्या प्रकल्पांत १५ टक्के उपयुक्त साठा अाहे. २०१४ मध्ये हा साठा ५० टक्के तर २०१३ मध्ये ५५ टक्क होता. मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये अनुक्रमे ११ व १५ टक्के साठा आहे. जलसंपदा विभागाचे सचिव शि. मा. उपासे यांनी सांगितले की, पाऊस झाला तरी पाण्याची स्थिती गंभीर आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी पोहोचवणे ही आजचे सगळ्यात मोठे आव्हान आहे. धरणांमध्ये यंदा उपयुक्त साठा कमी असल्याने मृत साठाही वापरावा लागणार आहे. मृत साठा पुढील वर्षीकरिता राखून ठेवलेला असतो. पुढील वर्षी पाऊस पडला नाही तर या साठ्यातून पिण्याचे पाणी देता येऊ शकते. परंतु यंदाच पाण्याची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे उपयुक्त साठ्याचे पाणी सर्वप्रथम पिण्यासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यानंतर उरलेले पाणी शेतीसाठी दिले जाणार आहे. जलयुक्त शिवारचा काही प्रमाणात यासाठी उपयोग होईल. मृतसाठा वापरणे म्हणजे पुढील वर्षीचा साठा यंदाच वापरण्यासारखे आहे. पावसाची खात्री नसल्याने सगळ्या गोष्टींचा विचार करूनच पाण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे, असे उपासे म्हणाले.
सध्याचा पाणीसाठा
११ मोठे प्रकल्प : ७९७ द.ल.घ.मी.
(२०१३ : २८०३ | २०१४ : २५६०)
७५ मध्यम प्रकल्प : १७४ द.ल.घ.मी.
(२०१३ : ५३० | २०१४ : ३२२)
७२८ लघु प्रकल्प : १७८ द.ल.घ.मी.
(२०१३ : ८६४ | २०१४ : ४४६)