आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathwada\'s Coopearative Soceity Provide Fodder

मराठवाड्यातील सहकारी संस्थांना चारा छावण्या चालविण्‍यासाठी तयार करावे : कदम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गंभीर दुष्काळी परिस्थिती पाहता मराठवाड्यात लवकरात लवकर चारा छावण्या सुरू करण्याबाबत सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. छावण्या सुरू करण्यासाठी मराठवाड्यातील सहकारी संस्थांना प्रवृत्त करावे, अशा सूचना जिल्हाधिका-यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी मंगळवारी दिली. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरऐवजी अन्य स्त्रोतातून पाणी उपलब्ध होत असेल तर त्यासाठीही सरकार मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेण्यात आली. यावेळी सहकार खात्याचे प्रधान सचिव, सहकार आयुक्त आणि साखर आयुक्त उपस्थित होते. यावेळी मराठवाड्यात चारा छावण्या सुरू करण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात आला असून सहकारी संस्थांनी चारा छावण्या सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यासाठी जिल्हाधिका-यांनी त्यांना प्रवृत्त करावे, अशा सुचनाही दिल्या आहेत.

नळयोजना दुरुस्त करा
पिण्याच्या पाण्याच्या टँकर्ससाठी जास्तीत जास्त निधी दिला जाईल, मात्र जेथे नळपाणी पुरवठा योजना दुरूस्त करणे शक्य आहे तेथे त्या कराव्यात. जेथे कालव्यातून अथवा अन्य ठिकाणाहून पाणी आणणे शक्य असेल तेथे अशा स्त्रोताचा वापर करण्यास परवानगी देण्याचा अधिकार जिल्हाधिका-या ंना देण्यात आला असल्याचे कदम म्हणाले.