आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातील पाण्याचे समन्यायी वाटप करण्याची मागणी मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे बुधवारी केली. पाणीवाटपाबाबत पावसाळ्याआधीच लेखी आदेश काढावेत, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
पाणीवाटपाचे नियम ठरलेले असताना वरील धरणांतून मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध झाला, अशी नाराजी आमदारांनी व्यक्त केली. यात राज्यमंत्री डी.पी. सावंत, आमदार प्रशांत बंब, कल्याण काळे, सुरेश जेथलिया, संजय शिरसाट, सतीश चव्हाण, किशनचंद तनवाणी, अमरसिंह पंडित, एम.एम. शेख, रामप्रसाद बोर्डीक, सुधाकर भालेराव, ओमप्रकाश पोकर्णा, वसंत चव्हाण, अमर राजुरकर, प्रकाश शेंडगे आदी 18 आमदारांचा समावेश होता.
आमदारांचे आंदोलन स्थगित
मुख्यमंत्र्यांनी लेखी आदेश काढण्याचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण कायदा 2013च्या नेमणूकीवर 30 मेपर्यंत निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यांच्या आवाहनावरून 21 मे रोजी पुकारण्यात आलेले सर्वपक्षीय आमदारांचे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे आमदार बंब यांनी सांगितले. 30 मेपर्यंत निर्णयाची अपेक्षा असून, तो झाला नाही तर आमदारांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे बंब म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.