आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maria, Raghuwanshi Name Consider For Mumbai Police Commissioner

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदासाठी मारिया, रघुवंशी यांची नावे चर्चेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी अनपेक्षितरीत्या स्वेच्छानिवृत्तीसाठी केलेला अर्ज राज्य सरकारने स्वीकारला आहे. त्यामुळे आता मुंबईचे नवे पोलिस आयुक्त कोण? या चर्चेला उधाण आले आहे. एटीएसटचे प्रमुख राकेश मारिया यांचे नाव आघाडीवर असून सेवाज्येष्ठतेनुसार अतिरिक्त पोलिस महासंचालक विजय कांबळे आणि जावेद अहमद यांचा आयुक्तपदावर हक्क आहे.
सतीश माथूर, ठाण्याचे आयुक्त के. पी. रघुवंशी यांची नावेही चर्चेत आहेत. सिंह यांच्या राजीनाम्यानंतर नव्या आयुक्तांच्या नावाची घोषणा सरकार करेल, अशी आशा होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत ही घोषणा झाली नसल्याने येथे कोणाची वर्णी लागेल याची चर्चा सुरू आहे.