आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी डॉ.बाबासाहेबांच्या जन्मगावी; गावांना विकासाच्या प्रवाहात आणणे गरजेचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर/ मुंबई- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्य प्रदेशातील महू येथे पोहोचले आहे. महू हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव आहे. मोदींनी बाबासाहेबांच्‍या पुतळ्याला नमन करून त्‍यांच्‍या पाळण्‍याला झुलवले.

नरेंद्र मोदी महूत म्हणाले, देशातील गावांना विकासाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेबांचे देखील हेच स्वप्न होते. शेतकऱ्याला पाणी मिळाल्यास तो मातीतून सोनं पिकवेल, असेही मोदी म्हणाले. बाबासाहेबांच्या जन्मगावी पोहोचणारे मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. बाबासाहेबांच्या आयुष्यावर आधारित प्रदर्शनीचे मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्‍यात आले.

'बाबासाहेब एक व्यक्ति नव्हे तर एक संकल्प होते. अपमानित व्हावे लागले मात्र, ते समाजापासून दूर गेले नाही. आज देशाला अजून खूप विकास करायचा आहे. लक्ष्य कठीण आहे. मात्र, घाबरण्याचे काही कारण नसल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

अपडेट्स:
- पंतप्रधान दुपारी दीड वाजता महू येथे पोहोचले.
- मोदींनी डॉ. बाबासाहेब स्मारकाला भेट देऊन त्यांच्या पुतळ्याला मार्ल्यापण केले. त्‍यांचा पाळणा झुलवला.
- स्मारकात बाबासाहेबाच्या जीवनावर आधारीत प्रदर्शनीचे उद्घाटन केले. प्रदर्शनीत बाबासाहेबांचा जीवनपट दर्शवणार्‍या 16 पेंटिंग्ज लावण्यात आल्या होत्या.
- पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते.
- यावेळी 3000 जवान तैनात करण्‍यात आले होते. कार्यक्रमस्थळी 150 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते.
ज्योतिरादित्य सिंधिया देखील पोहोचले महूत...
- कॉंग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देखील आज महूला भेट दिली. बाबासाहेब स्मारकावर जाऊन श्रद्धासुमने अर्पण केले.
- कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरुण यादव यांनी देखील बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली

डॉ.बाबासाहेब म्हणजे भारतातील पाणी, सिंचन व जलवाहतूक धोरणाचे शिल्पकार : मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) देशातील पहिली 'मेरिटाइम इंडिया समिट 2016' चे उद्घाटन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त अभ‍िवादन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतातील पाणी, सिंचन व जलवाहतूक धोरणाचे शिल्पकार होते, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

नरेंद्र मोदींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून 'मेरिटाइम इंडिया समिट 2006 चे उद्घाटन केले. केंद्रीय प‍रिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. देशाच्या मेरीटाइम सेक्टरवर आधारित एक शॉर्ट फिल्म यावेळी दाखवण्यात आली. यानंतर कोरियाचे मंत्री किम योंग-सुक यांचे भाषण झाले.

दरम्यान, 'मेरिटाइम इंडिया समिट' 14 ते 16 एप्रिलदरम्यान चालणार असून यात 40 देशातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. समिटमधून देशाला जवळपास 82 हजार कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, मुंबईत काय म्हणाले पंतप्रधान?