आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mark Anderson, New York Times Interview Regarding Mark Zuckerberg & Facebook

दोन वर्षातच फेसबुक विकणार होता झुकेरबर्ग, मात्र मित्र \'मार्क\'नेच वाचवले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: मार्क झुकेरबर्गसह मार्क अँड्रिसन व त्याची पत्नी)
मार्क झुकेरबर्गचे नाव आज सर्वांनाच परिचित आहे. आज त्याचा 31 वा वाढदिवस. जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किग साईट फेसबुकचा तो संस्थापक व सर्वेसर्वाही. पण याच मार्कला 2006 मध्ये मार्क नावाच्याच एका सहकारी मित्राने फेसबुक विकण्यापासून वाचविले होते. मार्क अँड्रिसन हे त्याचे नाव.
हा मार्क संस्थापक मार्क झुकेरबर्ग एवढा लोकप्रिय नाही व समोरही येत नाही. त्यामुळे हा मार्क मात्र तितकाच अपरिचित. याच मार्क अँड्रिसननी 2006 मध्ये याहू-फेसबुकमध्ये होणारा चार हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा करार झुकेरबर्गला मोडायला भाग पाडले होते. त्यांनी 'द न्यूयॉर्कर'ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तो प्रसंग सांगितला, जेव्हा प्रत्येक जण म्हणत होता - 'झुकेरबर्ग, फेसबुक विकून टाक, विकून टाक.' मात्र, मार्क अॅँड्रिसननी फेसबुक विकण्यापासून मार्क झुकेरबर्गला परावृत्त केले. वाचा एका मार्कने दुस-या मार्कविषयी व फेसबुकविषयी सांगितलेली कहाणी त्यांच्याच शब्दांत...
ही गोष्ट आहे जुलै 2006 ची, तेव्हा फेसबुक दोनच वर्षांचे बाळ होते. मात्र या गोंडस बाळाला अमेरिकेने दुसरी सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साइट बनवले होते. आम्ही त्याचे क्रमांक दोनचे गुंतवणूकदार होतो. अचानक कळले की, याहू ही फेसबुकला 4, 427 कोटींत खरेदी करू पाहत आहे. फेसबुकच्या ऑफिसमध्ये आनंदाचे वारे वाहू लागले. कंपनीचे नंबर वन गुंतवणूकदार एस्सेल पार्टनर्स हेही आनंदित होते. मात्र, झुकेरबर्ग संभ्रमात होता. खरे तर 22 वर्षांच्या तरुणासाठी ही मोठी संधी होती. कंपनीचे वय इनमिन दोन वर्षे अन् याहूसारख्या आयटी कंपनीकडून आलेली इतकी मोठी ऑफर. पण, मला वाटत होते की, ही डील मोठ्या यशाचा प्रवास येथेच संपवेल.
मी झुकेरबर्गला भेटलो. तो काहीही ठरवण्याच्या मन:स्थितीत नव्हता. तेव्हा फेसबुकमध्ये प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य होते, विकून टाका-विकून टाका, संधी चांगली आहे. मात्र, मी त्याला म्हणालो, विकू नको, कारण तू जेथपर्यंत फेसबुकला नेऊ शकतो, जेथपर्यंत फेसबुक जाऊ शकते, अशी ओळख अब्जावधी डॉलरही मिळवून देणार नाहीत. यावर त्याने संमतिदर्शक डोके हलवले. मात्र, कार्यालयात पुन्हा विकून टाका-विकून टाका असा धोशा सुरू झाला.
पण मी आणि झुकेरबर्गही खुश नव्हतो. हा मुद्दा आम्ही कार्यालयच नव्हे तर सागरकिना-यावर फिरत असतानाही चर्चिला होता. यादरम्यान आमचे नाते गुंतवणूकदार-ग्राहक ऐवजी मित्राचे झाले होते. शेवटी झुकेरबर्गने याहूला नकार दिला. तेव्हा फक्त एक अब्ज डॉलरमध्ये विकली जाणारी कंपनी आज 200 अब्ज डॉलर्सपेक्षा मोठी झाली आहे.