आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती बाहेरगावी, घरात एकटी असलेल्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - येथील पाचपाखडी परिसरात राहणाऱ्या श्रद्धा लाड या विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. परिसरातच वंडर किड्स नावाची एक नर्सरी असून लाड ते चालवत होत्या. गेल्या 12 वर्षांपासून त्या ही नर्सरी चालवतात. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे.
 
 
घरात एकटीच होती...
त्यांचा पती नेहमीच कामानिमित्त बाहेरगावी ये-जा करत असे. श्रद्धा यांनी आत्महत्या केली त्यावेळी सुद्धा पती बाहेरगावी होता. तसेच घरात मुले-मुली नसताना त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नौपाडा पोलिस करत आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...