आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बक्षिसाचे ११ लाख परत केले, गरिबांसाठी खर्च करण्याची विनंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भगवदगीता पठण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून देशभर चर्चेत अालेली मुस्लिम मुलगी मरियम सिद्दिकीने अाणखी एक निर्णय घेऊन नवा अादर्श निर्माण केला अाहे. या स्पर्धेत प्रथम अाल्याबद्दल उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव यांच्या सरकारने या मुलीला ११ लाख रुपये बक्षीस जाहीर केले हाेते. मात्र, मरियमने ही रक्कम त्या सरकारला परत पाठवून गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची विनंती केली अाहे.

‘शिक्षण हा एकमेव मार्ग अाहे, जाे अामचे भाग्य बदलू शकताे. तुमच्या राज्याचा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी निश्चितच सन्मानजनक बाब अाहे. मात्र, सुदैवाने खुदाने मला खूप काही दिले अाहे. अाज देशात अनेक मुले-मुली अशा अाहेत, ज्यांच्या नशिबी असे सुख नाही. या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अापल्या सरकारने ही रक्कम खर्च करावी म्हणून मी विनम्रतापूर्वक पुरस्काराची रक्कम परत करत अाहे,’ असे मरियम तिच्या कुटुंबीयांनी उत्तर प्रदेश सरकारला कळवले अाहे. जानेवारी महिन्यात अायाेजित देशपातळीवरील भगवद गीता पठण स्पर्धेत मरियमने प्रथम क्रमांक पटकावला हाेता. या स्पर्धेत सुमारे तीन हजार मुला-मुलींनी सहभाग घेतला हाेता.