आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Massive Fire Breaks Out At Warehouse Of CEAT Tyres, News In Amrathi

सीएट टायर कंपनीत आग; स्थानिक रेल्वे सेवेवर विपरीत परिणाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सीएट या टायर निर्माता कंपनीमध्ये रविवारी सायंकाळी भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. भांडुपजवळील नाहूर रेल्वे स्थानकाजवळ असणार्‍या कंपनीत ही आग लागली होती. आगीमुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आग लागल्याचे खात्रीलायक सूत्रांनी कळवले आहे. अग्निशमन दलाचे बंब व पाण्याच्या टँकरच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच नुकसानीबाबतही माहिती समजलेली नाही. दरम्यान, आगीमुळे नाहूर रेल्वेस्थानक परिसरातील वीजपुरवठा बंद करावा लागल्याने, लोकल रेल्वेमार्ग बदलण्यात आले होते.