आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Master Deenanath Mangeshkar Award News In Marathi

झाकीर हुसेन, अण्णा हजारे यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कला व साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ यंदा तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन आणि संगीतकार पंढरीनाथ कोल्हापुरे यांना जाहीर करण्यात आला. पुरस्कार वितरण 24 एप्रिलला मुंबईत होणार आहे.

सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य कामगिरीबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. आनंदमयी पुरस्कार ‘खरे वाचन मंदिर’ संस्थेला, तर साहित्यातील कामगिरीसाठी आनंद यादव यांचा गौरव होणार आहे. सिने क्षेत्रातून अभिनेते ऋषी कपूर यांना विशेष पुरस्कार, तर पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनंत दीक्षित व प्रकाश बाळ यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.