आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन लेखिकेकडे पाहून लज्‍जास्‍पद कृत्‍य; मुंबईतील प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मारियाना यांनी केलेले ट्वीट - Divya Marathi
मारियाना यांनी केलेले ट्वीट

मुंबई - ' अतिथी देवो भवं' म्‍हणत आपल्‍या देशात आलेल्‍या विदेशी पाहुण्‍यांना सन्‍मानाने वागणूक द्या, अशा जाहिरातील टीव्‍हीवरून वारंवार दाखवल्‍या जातात. पण, काही विकृत मनोवृत्‍तीच्‍या व्‍यक्‍तीमुळे आपल्‍या देशाला बदनामी सहन करावी लागते. असाच प्रकार मुंबईत घडला. येथे आलेल्‍या एका प्रसिद्ध अमेरिकन लेखिकेकडे पाहून एका तरुणाने Masturbation (हस्‍तमैथुन) केले. या बाबत संबंधित लेखिकेने ट्वीटरवर माहिती देऊन त्‍या तरुणाचा फोटोही पोस्‍ट केला.
नेमका काय प्रकार घडला
अमेरिकेच्या प्रसिद्ध लेखिका मरियाना अब्दो या सध्‍या भारतात पर्यटनासाठी आलेल्‍या आहेत. सोमवारी सकाळी 7.50 वाजता त्‍या मुंबईतील एका रस्‍त्‍यावर उभ्‍या होत्‍या. दरम्‍यान, एका तरुणाने त्‍यांच्‍याकडे एकटक पाहून हस्‍तमैथुन करायाला सुरुवात केली. हा अत्यंत किळसवाणा प्रकार पाहून मरियाना यांनी त्याला फटकारले आणि बाजूला असलेल्‍या दोन व्‍यक्‍तींना याची माहिती दिली. पण, त्‍या तरुणाने तत्‍काळ पळ काढला. मात्र, तो पळून जाण्‍यापूर्वी मारियाना यांनी त्‍याचा फोटो घेतला आणि ट्वीट केला.

वाचा मारियाना यांचे ट्वीट
Please RT-this man just masturbated at me on the street in broad daylight. Ran away after a confrontation. pic.twitter.com/VwzLndJvaw
— Maryanna Abdo (@MaryAbdo) August 17, 2015

ट्वीटला मिळाले 2,340 रिट्वीट
मारियाना यांनी ट्वीट करून म्‍हटले, फोटोमध्‍ये समोर दिसत असलेल्‍या तरुणाने हस्‍तमैथुन केले असून, त्‍याच्‍या पाठोपाठ असलेल्‍या दोन व्‍यक्‍तींनी आपल्‍याला मदत केली आहे. आतापर्यंत त्‍यांच्‍या या ट्वीटला 2,340 रिट्वीट मिळाले आहेत. दरम्‍यान, अनेकांनी त्‍यांना पोलिस ठाण्‍यात तक्रार देण्‍याचा सल्‍लाही दिला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा मारियाना यांनी केलेले ट्वीट आणि मिळालेले रिट्वीट...