आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेच्या खिंडारासाठी पद्धतशीर खेळी! रायगड, मावळमध्ये शेकापच्या डीलमागे 'राज'कारण?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चिपळूनचे राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांनी शेकापची उमेदवारी जाहीर झाली आहे. कदम यांना शेकापने उमेदवारी जाहीर केल्याने राष्ट्रवादीचे रागयडचे उमेदवार सुनील तटकरे यांचाच फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. कदम हे तटकरे यांचेच कट्टर समर्थक आहेत तर, भास्कर जाधव यांचे विरोधक म्हणून परिचित आहेत. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळ्या पद्धतीने शेकापचा वापर करून घेत आहेत का अशी शंका येण्यास वाव आहे.
शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांची मागील काही दिवसात बदललेली भूमिकेमागे संशय व्यक्त करण्यात येत आहे. जयंत पाटील यांनी सर्वप्रथम मनसे, शेकाप व जनसुराज्य यांची तिसरी आघाडीसाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी विनय कोरे यांच्यासह राज यांची भेट घेतली. मात्र, पुढे कुठे मांशी शिंकली याचा खुलासा ना जयंत पाटील यांनी केला ना राज ठाकरेंच्या मनसेने. मात्र, या भेटीनंतर शेकापने शिवसेनेचे रायगड आणि मावळमधील उमेदवार अडचणीत कसे येतील याचीच खेळी केल्याचे दिसत आहे. रायगड आणि मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. त्यातच जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीतीलच दोन बंडखोर अपक्षांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे यात मोठी 'सौदेबाजी' झाल्याची शक्यता आहे. याच्या केंद्रस्थानी अजित पवार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सुनील तटकरे व पिंपरी-चिंचवडमधील लक्ष्मण जगताप हे अजित पवारांचे कट्टर समर्थक आहेत. ज्या रमेश कदमांना शेकापने उमेदवारी जाहीर केली आहे ते तटकरेंचे खासमखास आहेत.
भास्करराव जाधव यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी येताच कदम यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता तटकरेंचा मार्ग मोकळा व्हावा व तटकरे-अजित पवारांच्या गुडबुकमध्ये असावे यासाठी शिवसेनेला एकगठ्ठा मिळणारी शेकापची मते खाण्यासाठीच कदमांनी लोकसभा लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसून येते. कारण गिते यांना 2009 मध्ये 4 लाख 13 हजार 546 तर काँग्रेसचे उमेदवार ए. आर. अंतुले यांना 2 लाख 67 हजार 25 मते मिळाली होती. गिते यांनी अंतुलेंचा सुमारे दीड लाखांच्या आसपास पराभव केला होता. यामागे शेकापची मोठी मदत होती, ही मतांची रसद खाऊन टाकण्याचा तटकरे-पवार जोडगळीने विचार केलेला दिसत आहे. त्यामुळेच कदम यांनी पक्षातून बाहेर पडत शेकापची मते खेचण्यासाठी त्यांची उमेदवारी स्वीकारली आहे.
कदम यांनी लाखभर मते खाल्यास तटकरेंसाठी रान मोकळे होईल असा राष्ट्रवादीचा अंदाज आहे. गितेंना दीड लाखाचे मताधिक्य मिळण्यास काँग्रेसचा मुस्लिम उमेदवार असल्याचाही फटका बसला होता. तटकरे उमेदवार असल्याने हिंदूंची मते तटकरेंना मिळतील असा होरा आहे. या अशा वजाबाकी व बेरजेच्या राजकारणातून तटकरेंना विजय मिळू शकेल असे राष्ट्रवादीला वाटत आहे. पण मतदारांचे काय सांगावे हाच डाव रायगडकर लोक राष्ट्रवादीवर उलटवूही शकतात.
पुढे वाचा, काय गणित आहे मावळ-रायगडचे...