आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमसीएविरुद्ध भूमिका घेणा-या सीसीआयवर बंदी, स्पर्धेत सहभागी होता येणार नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष रवी सावंत यांच्याविरुद्ध पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदासाठी उभे राहणाऱ्या टी. सी. मॅथ्यूज या दक्षिण विभागाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याबद्दल एमसीएने क्रिकेट क्लब ऑफ इंडियाला (सीसीआय) बंदीची शिक्षा केली आहे.
एमसीएविरोधी कारवाई केल्याबद्दल सीसीआयला एमसीएच्या अधिपत्याखाली होणा-या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्यापासून किंवा स्पर्धांचे आयोजन करण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. गतवर्षी आणि यंदाही एमसीएच्या हद्दीतील आयपीएल सामन्यांचे आयोजन करताना सीसीआयने एमसीएची परवानगी घेतली नाही. आपण त्याबाबतीतील निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत, असे सीसीआयला वाटते. त्यामुळे त्यांनी स्वतंत्ररीत्याच आपले क्रिकेट चालवावे, असे एमसीएचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी पत्रकारांना सांगितले.

‘१९४५ पासून आमच्या अधिपत्याखाली सीसीआय सामन्यांचे आयोजन करीत आहे. आता आम्ही त्यांना कोणत्याही सामन्यांसाठी पंच देणार नाही, तसेच आमच्या स्पर्धेत त्यांना सहभागी होण्याची परवानगी देणार नाही. सीसीआयतर्फे खेळणाऱ्या खेळाडूंवर अन्याय होऊ नये म्हणून एमसीएने त्या खेळाडूंना एमसीएशी संलग्न असणाऱ्या अन्य क्लबतर्फे खेळण्याची परवानगी दिली असल्याचे रवी सावंत यांनी स्पष्ट केले.

सूर्यकुमारचे मानधन रोखले
एमसीएने, सूर्यकुमार यादव या बेशिस्त वर्तणूक करणाऱ्या खेळाडूंचे गतरणजी हंगामातील मानधन रोखून धरले असून, यंदाच्या हंगामात त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीची हमी घेतली आहे. यंदाच्या हंगामात त्याची वर्तणूक सुधारली तरच त्याचे मानधन त्याला देण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादवला बेशिस्त वर्तणुकीमुळे गत रणजी हंगामात कप्तानपदावरूनही हटवण्यात आले होते.