आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mca Feliciated Sachin & Guru Ramakanth Achrekar Sir

PHOTOS: सचिनसह द्रविड-कुंबळेचा नव्या पिढीने आदर्श घ्यावा - शरद पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राजकारणात काम करीत असतानाच मी राज्यातील विविध क्रीडा संघटनेच्या माध्यमांतून अध्यक्षपद भूषविले आहे. आता मी क्रिकेटचा प्रशासक म्हणून काम पाहतोय. मुंबई क्रिकेटला शक्य तेवढ्या चांगल्या व जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा पुरवण्याचे माझे ध्येय आहे आणि त्यासाठी प्रयत्न करीत आहे. तसेच यात मला आनंद मिळतोय म्हणूनच मी मुंबई क्रिकेटसाठी काम करीत आहे, असे मत कृषिमंत्री व एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. याचबरोबर भावी पिढीने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अनिल कुंबळे यासारख्या महान खेळाडूकडून प्रेरणा घेतली पाहिजे. या खेळाडूंनी केवळ उत्तम खेळच खेळला नाही तर, संयम, विनम्रपणाही जगाला दाखवला ते निश्चित शिकण्यासारखे आहे. त्यामुळे आजच्या तरूण व महत्त्वकांक्षी पिढीने या त्रयीचा आदर्श आपल्यापुढे ठेवावा, असे सल्ला तेथे उपस्थित असलेल्या युवा खेळाडूंना दिला.
सचिन तेंडुलकरच्या गौरव सोहळ्यानिमित्त एमसीएने मंगळवारी सायंकाळी एक संस्मरणीय असा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी पवार बोलत होते. हा कार्यक्रम वांद्रे-कुर्ला संकुलातील शरद पवार इनडोअर क्रिकेट ऍकॅडमी आणि रिक्रिएशन सेंटरमध्ये पार पडला. मंगळवारी सचिन तेंडूलकर याचे प्रशिक्षक व गुरु रमांकात आचरेकर सरांचा वाढदिवस होता. त्यांनाही या कार्यक्रमाला निमंत्रण होते. त्याचा या कार्यक्रमात वाढदिवस साजरा करीत सत्कार करण्यात आला. याचबरोबर शालेय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि मुशीर खान यांचा एमसीएने विश्वविक्रमवीर सचिनच्या हस्ते गौरव केला. यावेळी सचिनची पत्नी अजंली उपस्थित होती.
या कार्यक्रमाची झलक पाहा पुढे छायाचित्राच्या माध्यमातून...