आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘चमत्‍कार’ : शाहरुखचे आता वानखेडेवर पुन्‍हा ‘मै हु ना’; प्रवेश बंदी उठवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: मुलगा सुहाना (डावीकडे) सोबतवानखेडेवर शाहरुख खान. - Divya Marathi
फाइल फोटो: मुलगा सुहाना (डावीकडे) सोबतवानखेडेवर शाहरुख खान.
मुंबई - ‘आयपीएल'मधील कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक असलेल्या शाहरुख खान याला वर्ष 2012 मध्‍ये वानखेडे स्‍टेडियमवर प्रवेशबंदी करण्‍यात आली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्‍या आज (रविवार) झालेल्‍या एका बैठकीत त्‍याच्‍यावरील ही बंदी उठली आहे. दरम्‍यान, पाच वर्षांसाठी असलेली ही बंदी तीनच वर्षांत कशी उठवलेली गेली या ‘चमत्‍कारा’ची ‘पहिली’ कायम आहे. कारण काहीही असो शाहरुखसाठी मात्र हा दुग्‍धशर्करा योग आहे. नुकत्‍याच झालेल्‍या कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल)चा किताब त्‍याची टीम त्रिनिनाद अॅण्‍ड टोबॅगो रेड स्टीलने पटकावला होता. त्‍या आनंदात आता भर पडली आहे.
का लादली होती बंदी
16 मे 2012 मध्ये वानखेडेवर कोलकाता विरूद्ध मुंबई इंडियन्स सामन्यानंतर शाहरुखने वानखेडे नियमांच्या चौकटीत राहून आपली ड्युटी करत असलेल्‍या एका सुरक्षा रक्षकाला शाहरुखने क्षुल्लक कारणावरून त्याला धक्काबुक्की केली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन मुंबई क्रिकेट असोसिएशनने शाहरुखवर स्टेडियममध्ये येण्यास पाच वर्षांची बंदी घातली होती. ती बंदी 2017 मध्ये संपणार होती. मात्र, बंदी घालण्यात आल्यानंतर गेल्या तीन वर्षांत कधीही मैदानात जबरदस्ती प्रवेश केला नसल्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्या बंदीत कपात करण्याचे करण्‍याचे कारण 'एमसीए'कडून समोर करण्‍यात आले.
पुढील स्लाइड्सवर फोटोज मध्‍ये पाहा, काय झाले होते 16 मे 2012 रोजी...