आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mca President Election Ratnakar Shetty ravi Sawant

एमसीए अध्यक्षपद : शेट्टी-सावंत यांच्यात सामना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठीच्या जागेसाठी कार्यकारिणीतील कोशाध्यक्ष रवी सावंत आणि उपाध्यक्ष रत्नाकर शेट्टी यांच्यात चुरस निर्माण झाली आहे.
विलासरावांच्या जागी अध्यक्ष म्हणून कुणाला निवडायचे, हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या घटनेनुसार कार्यकारिणीतील पदाधिकारी अथवा अध्यक्षाला अचानक पद सोडून द्यावे लागले किंवा जावे लागले तर त्या जागेवर कार्यकारिणीतील व्यक्तीची सर्वानुमते नियुक्ती करावी, असे म्हटले आहे.
त्यामुळे आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत आणि विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षपदासाठीचा कालखंड संपेपर्यंत हंगामी अध्यक्ष निवडावा लागणार आहे.
हंगामी अध्यक्षपदासाठी विद्यमान कोशाध्यक्ष रवी सावंत आणि विद्यमान उपाध्यक्ष रत्नाकर शेट्टी हे दोन प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
रवी सावंत हे विद्यमान कार्यकारिणीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि निवडणुकीतील एक प्रभावी गट म्हणून मानण्यात येणा-या बाळ महाडदळकर गटाचे प्रमुख आहेत. रत्नाकर शेट्टी शरद पवार समर्थक आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे विद्यमान कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनाही प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे या दोघांमध्ये लढत अटळ आहे, असे मानले जाते.